जमुई : यशाचा कोणताही शॉटकर्ट नसतो. जर प्रामाणिकपणे कठोर मेहनत केली तर व्यक्ती एक दिवस यशस्वी नक्कीच होतो, असे म्हटले जाते. असेच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. या व्यक्तीने आपल्या स्वत:च्या बळावर इतका मोठा व्यवसाय केला आहे, की सर्वसामान्य माणूस त्याची कल्पनाही करणार नाही.
रविरंजन कुमार यांची ही कहाणी आहे. त्यांचा कोणताही गॉडफादर नव्हता आणि बिझनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांची काही ओळखही नव्हती. मात्र, तरीही त्यांनी आज 973 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. आज जाणून घेऊयात, त्यांची अत्यंत प्रेरणादायी कहाणी.
advertisement
बालपणी आईच्या अंगणवाडीत शिकले -
रविरंजन कुमार हे बिहारच्या जमुई जिल्ह्यातील अलीगंज येथील नोनी गावातील रहिवासी आहेत. त्यांची कहाणी ही खूपच संघर्षमय राहिली आहे. रवि यांच्या आई गावातच अंगणवाडी चालवतात. त्यांचे वडील शेतकरी आहेत. रवि यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण हे आईच्या अंगणवाडी येथे घेतले.
आता केमिकल टाकण्याचीही गरज नाही, फक्त हे एक काम करा, घरात अनेक वर्ष खराब होणार नाही गहू
यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमध्ये स्कॉरलशिप मिळाली आणि स्कॉलरशिपच्या बळावर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये मार्केटिंगचे शिक्षण घेतले. मात्र, न्यूयॉर्कमध्ये शिकूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने अनेक कामं करावी लागली.
नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी नाईलाजाने यूएस एअर फोर्समध्ये काम करणे सुरू केले. यामध्ये त्यांना अफगाणिस्तान याठिकाणी पाठवण्यात आले. याठिकाणी त्यांनी सेवा बजावली. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ट्रेडिंगचे काम सुरू केले आणि मग मागे वळूनच पाहिले नाही. आज मागील 10 वर्षात त्यांनी तब्बल 973 कोटी रुपयांचा आपला व्यवसाय सुरू केला आहे.
पहिल्या भेटीतच झालं भांडण, आज दोन्हीही आहेत बिझनेस पार्टनर, नवरा-बायकोच्या स्टार्टअपची अनोखी कहाणी
रवि कुमार यांचे नाव मागच्या वर्षी मोस्ट एक्यूरेट ट्रेडर्स यांच्या रुपाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. आतापर्यंत त्यांनी 56 देशांचा प्रवास केला आहे. ते तरुणांसाठी प्रेरणा स्रोत बनले आहेत. त्यांच्या यशामुळे जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. तसेच त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.