वृत्त लिहून होईपर्यंत इंडसइंड बँकेचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले होते. इतर बँकांच्या तुलनेत या बँकेने सप्टेंबर तिमाहीमध्ये सर्वात खराब कामगिरी केली आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी बँकेच्या शेअर्सची टारगेट प्राइस कमी केली आहे. इंडसइंड बँकेचा या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचा नफा अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता. कमी मार्जिन, कमकुवत ऑपरेशन्स आणि अतिरिक्त तरतुदींमुळे नफ्यावर परिणाम झाल्याचं दिसत आहे.
advertisement
इंडसइंड बँकेचे शेअर्स एनएसईवर 19 टक्क्यांनी घसरून 1,039 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
विश्लेषकांची मतं आणि तज्ज्ञांची चिंता
एचडीएफसी इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या मते, व्यवस्थापनाने अतिरिक्त बफर तयार केले आहेत. पण, हाय-प्रॉफिटेबिलिटी क्षेत्राच्या वाढीचा मंद वेग, वाढता ऑपरेशनल खर्च, कलेक्शनसाठी केलेले प्रयत्न आणि अधिक क्रेडिट खर्च यामुळे बँकेच्या नफ्यावर मर्यादा येऊ शकतात. ब्रोकरेजने, बँकेच्या 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षातील नफ्याचा अंदाज 12 टक्क्यांनी कमी केला आहे. शिवाय, शेअर्सची टारगेट प्राइस 1,245 रुपये ठेवली आहे.
फिलिप कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, असुरक्षित कर्ज क्षेत्रातील तणावामुळे बँकेची प्रगती मंदावली आहे. मार्जिनवर परिणाम होऊन 2025 या आर्थिक वर्षात क्रेडिट खर्च वाढला आहे. या क्षेत्रातील आव्हानांमुळे मायक्रोफायनान्स (एमएफआय) पोर्टफोलिओला अपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. फिलिपकॅपिटलने सांगितले की, त्यांनी बँकेच्या पुढील दोन वर्षांच्या नफ्याच्या अंदाजात अनुक्रमे 17.7 टक्के आणि 6.4 टक्क्यांनी कपात केली आहे.
इतर ब्रोकरेजच्या प्रतिक्रिया
निर्मल बंग यांनी स्टॉकला 'बाय'वरून 'होल्ड'वर डाउनग्रेड केलं आहे आणि टारगेट प्राइस 1,653 रुपयांवरून 1,443 रुपये केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (एमओएफएसएल) सांगितलं की, हायर प्रोव्हीजन, इतर उत्पन्नात झालेली घट आणि हाय-यील्डिंग कर्जाच्या वाढीतील मंदी यांचा इंडसइंड बँकेच्या Q2 च्या निकालांवर परिणाम झाला आहे. ठेवींमधी वाढ मजबूत राहिली पण, मुदत ठेवी आणि जास्त खर्चामुळे एनआयएममध्ये घसरण झाली.