TRENDING:

Bank Holiday in March : बँकेत जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मार्च महिन्यात 14 दिवस बंद राहणार

Last Updated:

मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहणार आहेत, ज्यात पाच रविवार, दोन शनिवार आणि सणांच्या सुट्ट्या समाविष्ट आहेत. होळी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, पारशी नववर्ष यांसारखे सण आहेत. ऑनलाईन सुविधा सुरू राहतील.

advertisement
मुंबई: तुम्ही बँकेच्या कामाचं नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहणार आहेत. 14 दिवसांच्या बँक सुट्टीमध्ये पाच रविवार, दोन शनिवार आणि एक सणवार सुट्टीचा समावेश आहे. म्हणजेच मार्चमध्ये सणांमुळे बँका सात दिवस बंद राहणार आहेत. मार्चमध्ये होळी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, पारशी नववर्ष इत्यादी सणांचा समावेश आहे.
बँक हॉलिडे
बँक हॉलिडे
advertisement

अनेक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. जर तुम्ही मार्चमध्ये बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम या सुट्ट्यांबद्दल जाणून घ्या. सर्व राज्यांमध्ये बँका एकाच वेळी बंद राहणार नाहीत. देशभरात बँका एकाच वेळी बंद होत नाहीत. ज्या राज्यात सुट्टी असते तिथेच बँका बंद असतात.

मार्च महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1 मार्च (शनिवार) – रामकृष्ण जयंती (पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम)

advertisement

7 मार्च (शुक्रवार)- चापचर कुट

8 मार्च (शनिवार)- दुसरा शनिवार

9 मार्च (रविवार) - रविवार

13 मार्च (गुरुवार) – छोटी होळी, होलिका दहन (अखिल भारतीय, प्रादेशिक बँक सुट्टी)

14 मार्च (शुक्रवार) – होळी (राष्ट्रीय सुट्टी, प्रमुख बँक सुट्टी)

14 मार्च (शुक्रवार) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)

15 मार्च (शनिवार) - होळी/याओसांग दुसरा दिवस

advertisement

16 मार्च (रविवार) - रविवार

20 मार्च (गुरुवार) – पारशी नववर्ष (जमशेदी नवरोज) (महाराष्ट्र, गुजरात)

22 मार्च (शनिवार) - बिहार दिवस आणि चौथा शनिवार

23 मार्च (रविवार) – जुमात-उल-विदा (जम्मू-काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश – चंद्रदर्शनावर अवलंबून)

27 मार्च (गुरुवार)- शब-ए-कद्र

28 मार्च (शुक्रवार) – उगादी (कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा)

31 मार्च (सोमवार)- रमजान-ईद (ईद-उल-फित्र) (शव्वाल-1)/ खुतुब-ए-रमजान

advertisement

काही ठिकाणी सलग सुट्ट्या आल्यामुळे ATM मध्ये खडखडाट राहू शकतो, त्यामुळे तुम्ही आधीच पैसे थोडे काढून ठेवा. या सगळ्यात मात्र ऑनलाईन सुविधा सुरू राहणार आहेत. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे, नॉमिनी भरणे, किंवा पेमेंटची इतर छोटी कामं ऑनलाईन होऊ शकतात. तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या मदतीने कामं करू शकता.

मराठी बातम्या/मनी/
Bank Holiday in March : बँकेत जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मार्च महिन्यात 14 दिवस बंद राहणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल