पाच दिवसांचा कामाचा आठवडा
कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामाचा आठवडा करावा अशी मागणी वारंवार सुरू आहे. कामाताचे तास वाढवल्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टी द्यावी ही मागणी जोर लावून धरली आहे. आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही कुटुंबाला वेळ द्यायचा आहे," हा सूर आता अधिक तीव्र झाला आहे. देशभरातील ९ प्रमुख संघटनांचा समावेश असलेल्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) ने पाच दिवसांचा कामाचा आठवडा' ही मागणी लावून धरली आहे.
advertisement
काय आहे मागण्या
जर रिझर्व्ह बँक (RBI), LIC आणि शेअर बाजार पाच दिवस काम करू शकतात, तर आम्हालाच सलग दोन दिवस सुट्टी का नाही? कामाचा वाढता ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल राखण्यासाठी ही मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांनी तर असाही प्रस्ताव दिला आहे की, जर शनिवारची सुट्टी मिळाली, तर आम्ही सोमवार ते शुक्रवार रोज ४० मिनिटं जास्त काम करू. मात्र, हा निर्णय सर्वस्वी आरबीआयच्या हातात असल्याने पेच निर्माण झाला आहे.
का बंद राहणार बँका?
२४ जानेवारी शनिवार: महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना अधिकृत सुट्टी आहे.
२५ जानेवारी रविवार: साप्ताहिक सुट्टी.
२६ जानेवारी सोमवार: 'प्रजासत्ताक दिन'
२७ जानेवारी मंगळवार: जर प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले, तर या दिवशीही व्यवहार ठप्प राहतील.
तुमच्या खिशावर आणि कामावर काय परिणाम होणार?
१. चेक क्लिअरन्स- जर तुम्ही शुक्रवारी चेक टाकला, तर तो थेट बुधवारी किंवा गुरुवारी क्लिअर होण्याची शक्यता आहे.
२. कॅश विड्रॉल- बँका बंद असल्याने एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण होऊ शकते.
३. शाखा भेट- केवायसी अपडेट किंवा इतर कागदोपत्री कामांसाठी तुम्हाला किमान २८ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.
४. चुकून सर्व्हर डाऊन झाले तर तुमचं ऑनलाईन पेमेंट करण्यात देखील अडचणी येऊ शकतात
५. सलग सुट्ट्यांमुळे बँकेच्या ATM मध्ये खडखडाट राहू शकतो. त्यामुळे हातात थोडे पैसे ठेवा.
