मुंबई: शेअर बाजारात जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर कोणत्याही ठोस कारणाविना अचानक वाढतो किंवा घसरतो, तेव्हा अशा शेअर्सवर सर्वात आधी एक्स्चेंजची नजर जाते. बीएसई (BSE) च्या प्राइस मॉनिटरिंग सेल (Price Monitoring Cell) ने अशाच 23 शेअर्सची ओळख पटवली आहे ज्यात अलीकडे असामान्य वाढ दिसून आली होती. त्यामुळे 6 नोव्हेंबर 2025 पासून या शेअर्सचे प्राइस बँड (Price Band) कमी करण्यात आले आहेत, जेणेकरून सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवता येईल आणि लहान गुंतवणूकदारांचे संरक्षण होईल. काही शेअर्सना ट्रेड-टू-ट्रेड (T2T) सेगमेंटमध्ये देखील हलवण्यात आले आहे.
advertisement
का आणि कोणत्या शेअर्सवर कारवाई केली?
BSE चं प्राइस मॉनिटरिंग सेल दररोज किंमती आणि ट्रेडिंग वॉल्यूमच्या आधारे अलर्ट सिस्टीम चालवतं. जर एखाद्या शेअरमध्ये असामान्य हालचाल दिसली; जसे की वॉल्यूममध्ये अचानक वाढ, सतत अपर सर्किट लागणे, किंवा अफवांवर आधारित ट्रेडिंग वाढणे – तर एक्सचेंज तात्काळ कारवाई करतं. ही पावले सट्टेबाजांमुळे होणारी कृत्रिम किंमत चढ-उतार (price manipulation) टाळण्यासाठी उचलली जातात.
BSE ने खालील शेअर्ससाठी प्राइस बँड मर्यादा कमी केली आहे.
Thangamayil Jewellery Ltd – 20% वरून 10%
GTN Textiles Ltd – 20% वरून 5%
Lancer Container Lines Ltd – 10% वरून 5%
Mac Hotels Ltd – 20% वरून 5%
Duke Offshore Ltd – 20% वरून 10%
Nirmitee Robotics India Ltd – 20% वरून 10%
Tierra Agrotech Ltd – 20% वरून 10%
Golkonda Aluminium Extrusions Ltd – 10% वरून 5%
Containe Technologies Ltd – 10% वरून 5%
Jay Ushin Ltd – 10% वरून 5%
Keynote Financial Services Ltd – 20% वरून 10%
Esha Media Research Ltd – 5% वरून 2%
BGIL Films & Technologies Ltd – 5% वरून 2%
Bharat Bhushan Finance & Commodity Brokers Ltd – 10% वरून 5%
Contil India Ltd – 20% वरून 10%
Kiduja India Ltd – 10% वरून 5%
MAGNUS Steel and Infra Ltd – 10% वरून 5%
Octaware Technologies Ltd – 20% वरून 5%
Onelife Capital Advisors Ltd – 10% वरून 5%
Star Housing Finance Ltd – 20% वरून 10%
Tamilnadu Steel Tubes Ltd – 5% वरून 2%
TCM Ltd – 10% वरून 5%
Vani Commercials Ltd – 20% वरून 5%
या शेअर्सपैकी बहुतांश लहान किंवा कमी लिक्विडिटी असलेले (low liquidity) स्टॉक्स आहेत, ज्यात अचानक वॉल्यूम वाढल्यास स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगचा धोका वाढतो.
गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय?
जेव्हा एखाद्या शेअरचा सर्किट बँड कमी केला जातो, तेव्हा त्या शेअरच्या दिवसभरातील किंमतीतील हालचालींना मर्यादा घातली जाते. उदाहरणार्थ: जर एखादा शेअर आधी 20% वर किंवा खाली जाऊ शकत होता, तर आता तो फक्त 5% किंवा 10% पर्यंतच बदलू शकेल.
यामुळे दोन मोठे परिणाम होतात:
असामान्य चढ-उतार थांबतात, त्यामुळे शेअरच्या किंमती स्थिर राहतात.
लहान गुंतवणूकदार सुरक्षित राहतात, कारण सट्टेबाजांना “प्राइस गेम” खेळता येत नाही.
Trade-to-Trade (T2T) म्हणजे काय?
ज्या शेअर्सना Trade-to-Trade सेगमेंटमध्ये हलवलं जातं, त्यात इंट्राडे ट्रेडिंगची परवानगी नसते. म्हणजेच, जर तुम्ही एखादा शेअर आज खरेदी केला, तर तो त्या दिवशी विकता येत नाही. तुम्हाला त्या शेअरची फिजिकल डिलिव्हरी घ्यावी लागते, म्हणजेच फक्त गंभीर गुंतवणूकदारच अशा शेअर्समध्ये व्यवहार करतात.
ही नियमावली सामान्यतः अशा कंपन्यांवर लागू होते:
ज्यांचा मार्केट कॅप 500 कोटींपेक्षा कमी आहे
ज्यांचा PE Ratio खूप जास्त आहे,
किंवा ज्यांच्या वॉल्यूममध्ये अचानक वाढ दिसते.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
-जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या 23 शेअर्सपैकी कोणताही शेअर असेल, तर घाबरून विक्री (panic selling) टाळा.
-सर्किट बँड कमी होणं हे फक्त तात्पुरतं निरीक्षणात्मक पाऊल आहे, याचा अर्थ असा नाही की ती कंपनी खराब आहे.
मात्र जर एखाद्या शेअरमध्ये अचानक वॉल्यूम वाढला आणि त्याचे फंडामेंटल्स कमजोर असतील, तर काळजीपूर्वक व्यवहार करा. नवीन गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समध्ये इंट्राडे किंवा सट्टेबाजी टाळावी, कारण किंमत बदलाची मर्यादा आता ठरवलेली आहे.
BSE चा उद्देश
BSE ने स्पष्ट केलं आहे की या सर्व कारवायांचा उद्देश बाजारातील पारदर्शकता आणि स्थिरता कायम ठेवणं हा आहे.
एक्स्चेंजनुसार, सर्किट फिल्टर बदलणे आणि शेअर्सना T2T सेगमेंटमध्ये हलवणे यासारख्या उपायांमुळे मार्केट मॅनिप्युलेशनवर नियंत्रण येतं आणि रिटेल गुंतवणूकदारांना सुरक्षा मिळते.
