TRENDING:

Budget 2024 : नव्या वधू आणि वराला मिळणार 25 हजार रुपये, शिंदे सरकारची मोठी घोषणा

Last Updated:

Budget 2024 : पहिल्या लग्नासाठी हे अनुदान देण्यात येईल. पुर्नविवाह अथवा दुसरं लग्न असेल तर 25 हजार रुपये अनुदानाचा लाभ त्या जोडप्याला घेता येणार नाही. ते अवैध ठरवण्यात येईल.

advertisement
मुंबई : शिंदे सरकारचा नव्या वर्षाचा अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरपूर घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात सामूहिक विवाहासाठीची रक्कम वाढवली आहे. सामूहिक पद्धतीनं विवाह करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अनुदानाची रक्कम वाढवली आहे.
विवाह
विवाह
advertisement

सामूहिक विवाह करणाऱ्या वर आणि वधूला सरकारकडून प्रत्येकी 10 हजार रुपये रक्कम दिली जात होती. आता ही रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नववधू आणि वराला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी 25 हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. वराचे वय हे 21 वर्ष पूर्ण तर वधूचे वय हे 18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे. याशिवाय दोघंही महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवेत. पहिल्या लग्नासाठी हे अनुदान देण्यात येईल. पुर्नविवाह अथवा दुसरं लग्न असेल तर 25 हजार रुपये अनुदानाचा लाभ त्या जोडप्याला घेता येणार नाही. ते अवैध ठरवण्यात येईल.

advertisement

वधू ही विधवा अथवा नवऱ्याने घटस्फोट दिलेला असल्यास तिला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल. कुटुंबियांकडून हुंडा घेतला अथवा त्या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. या योजनेंतर्गत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील.

advertisement

100 च्या वर जोडप्यांचा समावेश असलेल्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सामूदायिक विवाहाचं रेकॉर्डिंग करणं ते सादर करणं, लग्नाची नोंदणी, सामूहिक विवाह केल्याची नोंदणी यासोबत इतर कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/
Budget 2024 : नव्या वधू आणि वराला मिळणार 25 हजार रुपये, शिंदे सरकारची मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल