मुंबई : एप्रिल महिना लवकरच सुरु होणार असून उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झालीये. त्यामुळे बहुतेक महिला या उन्हाळ्यात घरात वापरण्याच्या कपड्यांमध्ये सुटसुटीत गाऊन घालण्यास प्राधान्य देतात. उन्हातान्हाचे बाहेरून फिरून घरी आल्यास कधी ते घामाने थबथबलेले कपडे काढून, अंगावर गाऊन चढवतोय असे वाटते. उन्हाळ्यात कॉटनचा मऊसूत गाऊन एकदा परिधान केला की मग मात्र एकदम रिलॅक्स आणि मोकळं-मोकळं वाटते. म्हणूनच उन्हाळ्यात गाऊन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होतांना दिसून येते. त्यामुळे तुम्हाला कॉटनच्या गाऊनची स्वस्तात व्यसायासाठी खरेदी करायची असेल तर मुंबईतील एका ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
दादरमधील जनता बाजार हे होलसेल कपड्यांसाठी एक प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणी अगदी कोणत्याही प्रकारचे कपडे होलसेल भावात खरेदी करता येतील. देशभराच्या अनेक ठिकाणाहून लोक त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे मोठे भांडवल या ठिकाणाहून खरेदी करतात. याच ठिकाणी मेहबूब अँड सन्स हे दुकान महिलांच्या गाऊनची होलसेल विक्रेते आहेत. होलसेल सोबतच बांद्रा याठिकाणी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे.
पोळी लाटण्याचं काम ते आज स्वत:चं दुकान, डोंबिवलीच्या बॅगवाली मावशीची अत्यंत प्रेरणादायी कहाणी Video
या कंपनीचे व्यवस्थापक शादाब खान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या ठिकाणी महिलांचे 30 पेक्षा अधिक प्रकारचे गाऊन उपलब्ध आहेत. त्यापैकी मेगा स्लिव्हस, पायपिंग गाऊन, बाटिक गाऊन, मिडी, क्रोसीन गाऊन, ढाबु गाऊन, अल्फाईन गाऊन, टाय डाय गाऊन, अफसरा गाऊन इत्यादी प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रकारचे गाऊन या ठिकाणी M पासून ते XXXL या साईझ रेंजमध्ये सोबतच विविध कलरमध्ये मिळतील.
हे दुकान होलसेल दुकान असून या ठिकाणी महिलांचे गाऊन हे 100 रुपयांपासून सुरु होतात. स्वतःचा व्यवसाय कमी पैशात सुरु करायचा झाल्यास हे दुकान नक्कीच एक उत्तम पर्याय ठरेल. 15 हजार रुपयांच्या किमतीत महिलांच्या गाऊनचा व्यवसाय सुरु करता येईल. सोबतच मोठ्या संख्येत या ठिकाणी गाऊन खरेदी केल्यास एक गाऊन प्रत्येकी 65 रूपयांत पडेल. 15 हजार रुपये इन्व्हेस्ट केल्यास 100 रुपयांचा गाऊन 300-400 रुपयांत विकल्यास, पहिल्या इन्वेस्टमेन्टमध्ये 4-5 हजारांचा नफा होऊ शकतो, अशी माहितीही शादाब खान यांनी दिली.