पोळी लाटण्याचं काम ते आज स्वत:चं दुकान, डोंबिवलीच्या बॅगवाली मावशीची अत्यंत प्रेरणादायी कहाणी Video

Last Updated:

डोंबितलीतील बबिता चव्हाण गेल्या 15 वर्षांपासून बॅग विकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बबिता चव्हाण यांना डोंबिवलीच्या फेमस बॅगवाली मावशी या नावाने सर्वजण ओळखतात.

+
News18

News18

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
डोंबिवली : स्त्रियांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. यामध्ये व्यवसाय क्षेत्रही मागे नाही. डोंबिवलीतील बबिता चव्हाण गेल्या 15 वर्षांपासून बॅग विकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बबिता चव्हाण यांना डोंबिवलीच्या फेमस बॅगवाली मावशी या नावाने सर्वजण  ओळखतात. कारण या मावशींचं डोंबिवलीमध्ये बॅगच एक दुकान आहे. मुख्य म्हणजे मावशींनी त्यांच्या दुकानाचं नावही बॅगवाली मावशी असंच ठेवलं आहे. या मावशींच्या दुकानात राजस्थानी भरजरी वर्क असलेल्या बॅगेपासून ते ज्यूटच्या बॅगेपर्यंत तसेच खणाच्या पर्स पासून ते साडीच्या पदराच्या बॅगपर्यंत सगळ्या पॅटर्नच्या बॅग मिळतात. या बॅग कमी किमतीत तुम्हाला इथे खरेदी करता येतील.
advertisement
अनेक पॅटर्नच्या बॅग उपलब्ध 
बबिता मावशी गेल्या 15 वर्षांपासून डोंबितलीतील कस्तुरी प्लाझा समोर व्य़वसाय करतायत. मावशी आधी घरगुती किंवा जशी ऑर्डर असेल तशी आणि तिथे पोळ्या लाटण्याचं काम करायच्या. पण मावशींना सुरुवातीपासूनच स्वत:चं असं काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी बॅगचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला जास्त भांडवल नसल्यानं त्यांनी 15 रुपयांच्या छोट्या पर्सपासून व्यवसायाला सुरुवात केली. आणि पाहता पाहता आज स्वत:चं मोठं दुकान त्यांनी उभं केलं आहे. म्हणून मावशींनी त्यांच्या दुकानाला बॅगवाली मावशी असचं नावही दिलं. आज मावशींकडे त्याच 15 रुपयांच्या बॅग पासून ते 500 ते 600 रुपयांपर्यंतच्या अनेक पॅटर्नच्या बॅग आहेत.
advertisement
सलून व्यवसाय करायचा आहे, तर मग हे ठिकाण आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय, मिळतील स्वस्त वस्तू
बबिता मावशींकडे ज्यूटच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅगची किंमत फक्त 80 ते 100 रुपयांपासून सुरु होते. पुढे बॅगच्या आकारानुसार किंमत बदलत जाते. राजस्थानी भरजरी वर्क असलेल्या बॅगची किंमत फक्त 120 ते 200 रुपयांपासून सुरु होते. ज्या बॅग ऑनलाईन किंवा इतर बाजारात तब्बल 400 ते 500 रुपयांच्या घरात मिळतात. तसेत यातील सगळ्यात मोठ्या आकारची बॅगेची किंमत ही 500 ते 600 रुपयांपासून सुरु होते. खणाचे मोबाईल कव्हरची किंमत फक्त 30 ते 40 रुपयांपसून सुरु होते. एवढचं काय तर राजस्थानी वर्क असलेल्या साईड पर्सची किंमत फक्त 80 ते 100 रुपयांपासून सुरु होते. मावशींच्या दुकानात सगळ्याच बॅगची रिटेल किंमत तुम्हाला होलसेल किंमतीप्रमाणेच बघायला मिळतील. त्यामुळे शक्यतो अख्ख्या डोंबिवलीमध्ये या बॅगवाल्या मावशी एवढ्या फेमस आहे.
advertisement
सुंदर नेल एक्सटेंशन करा आता घरच्या घरी: 'इथं' 80 रुपयांपासून खरेदी वस्तू
दरम्यान मावशींनी सांगितल्या प्रमाणे सुरुवातीला त्यांनी भाड्यानं छोटीशी जागा घेऊन हा व्यवसाय सुरु केला पण आज मेहनतीनं त्यांनी स्वत:चं दुकान उभारलं आहे. आता हेच दुकान आणखी मोठं करायचं आणि अजून वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅग विक्रीसाठी आणायच्या असं मावशींचं स्वप्न आहे. त्यासाठी त्या आताही तेवढीचं मेहनत करताना दिसतात. तसेच प्रत्येक स्त्रीनं आपल्याला आवडणाऱ्या व्यवसायात उतरण्याची हिंमत केली पाहिजे असंही म्हणाल्या. महिलांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं आणि त्याला मेहनतीची जोड दिली की नक्कीच यश मिळतं हेही मावशींनी दाखवून दिलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
पोळी लाटण्याचं काम ते आज स्वत:चं दुकान, डोंबिवलीच्या बॅगवाली मावशीची अत्यंत प्रेरणादायी कहाणी Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement