advertisement

भाजपच्या राज्यात बंगाली तरुणाची हत्या, ममतादीदींच्या आरोपाचं पुणे पोलिसांनी केलं 'पोस्टमार्टम', धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

ममता बॅनर्जी यांच्या ट्वीटनंतर पुणे पोलिसांनी घटनास्थळीची माहिती घेतली आणि २ संशयितांना ताब्यात घेतलं.

News18
News18
पुणे : पुण्याच्या कोरेगाव भिमामध्ये एका २७ वर्षीय पश्चिम बंगालच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यात बंगाली नागरिकांवर हल्ले होत असल्याचा आरोप केला होता. पण, पुणे पोलिसांनी याा प्रकरणी तपास केला असता या तरुणाच्या हत्येचं मुळ कारण समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमा कोरेगाव परिसरात घर या हॅाटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत १० फेब्रुवारी रोजी सुखन महतो या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांत बंगाली नागरिकांवर बंगाली बोलत असल्यामुळे हल्ले होत असल्याचा आरोप केला होता.
ममता बॅनर्जी यांच्या ट्वीटनंतर पुणे पोलिसांनी घटनास्थळीची माहिती घेतली आणि २ संशयितांना ताब्यात घेतलं.  'सुखन महतो आणि त्याच्या मित्राचे दारू पिल्यानंतर काही स्थानिक तरूणांसोबत वाद झाले होते.. त्यानंतर या वादावादीचं पर्यवसन हाणामारीत झालं आणि महतो याचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलंय, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.
advertisement
काय आहे प्रकरण? पोलिसांनी काय दिली माहिती?
१० फेब्रुवारी रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मयत तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.  सुकेन महातो असं मयताचं नाव आहे, तो मुळाचा बंगलाचा आहे. हा मयत पश्चिम बंगालमध्ये राहणार होता. भीमा कोरेगाव येथे राहत होता.  या परिसरात तो ओळखीच्या असणाऱ्या २ व्यक्तींना भेटला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत  सुकेनची कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. या वादातून त्यांच्यामध्ये भांडण झालं. त्यातून हा हत्येचा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यास आमची टीम गेली आहे. त्याच्या हालचालीवरून प्रथमदर्शनी तो दारू प्याला होता, असं दिसत आहे. पण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बाकी गोष्टी स्पष्ट होईल, असं गिल यांनी सांगितलं.
advertisement
तसंच, "जसं प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे, कोणत्याही जातीच्या आणि रााज्याच्या व्यक्तीला टार्गेट करून हत्या केली, अशी कोणतीही माहिती समोर आला नाही. आमच्या तपासात अशी कोणतीही समोर आली नाही.  याबाबत आम्ही आता तपास करत आहोत. कुठल्याही जातीला टार्गेट ठेवून मारलं असं यात दिसत नाही. आरोपीने का हत्या केली याचा तपास करत आहेत, अशी माहितीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
भाजपच्या राज्यात बंगाली तरुणाची हत्या, ममतादीदींच्या आरोपाचं पुणे पोलिसांनी केलं 'पोस्टमार्टम', धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement