Wifi वारंवार डिस्कनेक्ट होतंय? असु शकतात ही कारणं, पाहा कसे करायचे दूर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
इंटरनेटच्या जगतात वायफाय हे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र अनेकदा वायफाय वापरत असताना ते वारंवार ड्रॉप होते. यामुळे काम करताना मजा येत नाही. हा प्रॉब्लम कसा दूर करायचा पाहूया...
इंटरनेटचा फ्लो नेहमीच चांगला राहावा यासाठी आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे वायफायचा वापर करतात. मात्र असं करुनही त्यात प्रॉब्लम आला तर डोक्याला ताप होतो. अनेकदा आपण स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा ऑफिसची ऑनलाइन मीटिंग करत असता आणि अचानक वाय-फाय कनेक्शन ड्रॉप झालं तर पूर्ण कामच खराब होते. यामुळे फक्त कामावर परिणाम होत नाही. तर आपला वेळही वाया जातो.
advertisement
advertisement
खूप जास्त डिव्हाइस कनेक्ट केलेले आहेत : तुमचे कनेक्शन वारंवार बंद पडत असेल, तर एक कारण म्हणजे तुमच्या वाय-फायशी खूप जास्त डिव्हाइस कनेक्ट केलेले असू शकतात. कनेक्ट केलेले डिव्हाइस कोणताही डेटा वापरत नसले तरीही ते बँडविड्थ वापरतात. त्यापैकी मोठ्या संख्येने तुमचे कनेक्शन बंद पडण्यास कारणीभूत ठरू शकतात. हे दुरुस्त करण्यासाठी, अनावश्यक डिव्हाइस डिस्कनेक्ट करा.
advertisement
राउटरचे लोकेशन : मजबूत वायफाय कनेक्शनसाठी राउटरचे लोकेशन महत्त्वाचे आहे. तुमचे डिव्हाइस राउटरपासून खूप दूर असेल तर त्यामुळे कनेक्शन तुटू शकते. त्याचप्रमाणे, जर राउटर इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या मागे ठेवला असेल तर त्याचे कनेक्शन कमकुवत होऊ शकते. हे टाळण्यासाठी, राउटर अशा ठिकाणी ठेवा जिथे कनेक्शन डिव्हाइसपर्यंत जास्त अडथळा न येता पोहोचते.
advertisement
राउटर जुना होणे : तुम्ही कनेक्टेड डिव्हाइस लिमिट केले आणि राउटर लोकेशन चेंज केल्यानंतर कनेक्शन ड्रॉप होत असतील तर तुम्हाला राउडर बदलण्याची गरज आहे. खरंतर जुने राउटर नवीन सर्व्हिसेसला कंपॅटिबल नसतात. यामुळे एकदा रिसेट केल्यानंतर हे काही काळापर्यंत चालतात. मात्र पुन्हा प्रॉब्लम येऊ लागते. तुमच्यासोबतही असेच होत असेल तर नवीन राउटर घेणे सर्वात फायदेशीर ऑप्शन आहे.





