advertisement

चार्जिंगशी संबंधीत 'या' चुकीमुळे खराब होतो तुमचा फोन! आजच बदला या सवयी

Last Updated:
स्मार्टफोन वापरत असताना तो चार्ज करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र अनेक लोक हे करत असताना अशा काही चुका करतात ज्याचा परिणाम थेट त्यांच्या मोबाईलवर होतो. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
1/7
Phone Battery Safety Tips: स्मार्टफोन वापरत असताना त्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. कारण चार्जिंग करताना केलेल्या काही चुका हे स्मार्टफोनला डॅमेज करत असतात. अनेक लोक तर रात्री झोपण्यापूर्वी आपला फोन चार्जिंगला लावून तसेच झोपतात. अशा अनेक चुका लोक नकळत करत असतात. त्याविषयीच आपण सविस्तर जाणून घेऊया.

2/7
फूल चार्ज केल्यानंतर फोन प्लग इन ठेवणे : आधुनिक स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरी असतात, ज्यांचे चार्जिंग लाइफ मर्यादित असते. जेव्हा फोन पूर्णपणे चार्ज झाल्यानंतरही चार्जरशी जोडलेला राहतो, तेव्हा बॅटरी वारंवार मायक्रो-चार्जिंग सायकलमधून जाते. याचा बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि बॅटरीचे आयुष्य कमी होते.

3/7
ओव्हरहीटिंगकडे होण्याकडे दुर्लक्ष करणे : रात्रभर फोन चार्जिंगला ठेवल्याने फोन आणि चार्जर जास्त गरम होऊ शकतात. फोन उशी, ब्लँकेट किंवा गादीवर ठेवला असेल तर वेंटिलेशनचा अभाव उष्णता आणखी वाढवू शकतो. या जास्त गरम होण्यामुळे कधीकधी शॉर्ट सर्किट, आग किंवा स्फोट देखील होऊ शकतो, विशेषतः जर स्थानिक किंवा कमी दर्जाचा चार्जर वापरला असेल.

4/7
पॉवर फ्लक्चुएशनमुळे होऊ शकतं नुकसान : रात्रीच्या वेळी वीजेच्या वोल्टेजमध्ये चढ-उतार होणे सामान्य आहे. अशावेळी फोन सतत चार्जिंगवर लावलेला असेल तर पॉवर फ्लक्चुएशनने बॅटरी, चार्जिंग पोर्ट किंवा मदरबोर्डला नुकसान पोहोचू शकते. झोपताना यावर लक्ष नसल्याने धोका आणखी वाढू शकतो.

5/7
फोनच्या परफॉर्मेंसवरही होतो परिणाम : दीर्घकाळापर्यंत चार्जिंगवर राहिल्याने फोनची चार्जिंग सिस्टम आणि काही हार्डवेयर सतत अॅक्टिव्ह राहतात. यामुळे फोनवर अतिरिक्त दबाव पडतो. हळुहळू फोन स्लो होतो. अॅप्स उशीराने ओपन होतात आणि हँग किंवा लॅग सारख्या समस्या समोर येऊ शकतात.

6/7
किती चार्ज योग्य आहे? : तुमचा फोन प्रत्येक वेळी 100% चार्ज करणे आवश्यक नाही. तज्ञांचा असा सल्ला आहे की बॅटरी 20% ते 80% दरम्यान ठेवणे चांगले. यामुळे बॅटरीवर कमी ताण येतो आणि तिचे आयुष्य वाढते. अनेक नवीन स्मार्टफोनमध्ये ऑप्टिमाइझ्ड किंवा अ‍ॅडॉप्टिव्ह चार्जिंग फीचर देखील असतात, जी बॅटरी सुरक्षितपणे चार्ज करतात.

7/7
चार्जिंग करताना या महत्त्वाच्या खबरदारी घ्या : तुमचा फोन चार्ज करताना नेहमी मूळ किंवा सर्टिफाइड चार्जर आणि केबल वापरा. ​​चार्जिंग करताना फोन उशी किंवा ब्लँकेटखाली ठेवू नका. फोन जास्त गरम झाला तर ताबडतोब चार्जिंग थांबवा. रात्रभर चालू ठेवण्याऐवजी दिवसा किंवा संध्याकाळी चार्जिंग करण्याचा प्रयत्न करा. आवश्यक असल्यास, बॅटरी पूर्ण भरल्यावर पॉवर बंद करणारा स्मार्ट प्लग किंवा टायमर वापरा.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement