कमी बजेटमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज पीसचा व्यवसाय करायचाय? डोंबिवलीतील ‘हे’ मार्केट आहे खरेदीला बेस्ट पर्याय
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज पीसपासून तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर हे मार्केट उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात ब्लाऊज पीसची खरेदी करता येईल.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
ठाणे : मुंबई म्हटलं की होलसेल मार्केट नक्कीच आठवतं. ज्यांना व्यवसाय करायचाय त्यांच्यासाठी तर होलसेल मार्केट म्हणजे जवळचा विषय असतो. पण असेच एक होलसेल मार्केट ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या डोंबिवलीमध्येही आहे. या मार्केटच नाव चिंधी मार्केटमध्ये आहे. सगळ्यात मोठं होलसेल मार्केट इथे चक्क किलोवर कपडे मिळतात. या चिंधी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिझायनर फॅब्रिकही मिळतात. या फॅब्रिकपासून तुम्ही साड्या, ब्लाऊज, घागरे, वन पिस, गाऊन यासारखे अनेक डिझायनर कपडे शिवून घेऊ शकता. विशेष म्हणजे हे शिवलेले कपडे लग्न कार्यात घालू शकता. पण जर तुम्हाला घरातून साडी, ड्रेसपीस, दागिने या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज पीसपासून तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल चिंधी मार्केट उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात ब्लाऊज पीसची खरेदी करता येईल.
advertisement
कुठे कराल खरेदी?
चिंधीमार्केट मधील हनुमान टेक्सटाईल हे असचं एक दुकान आहे. ज्या दुकानात तुम्हाला ब्लाऊज पीसचे कापड अगदी किलोच्या भावानंही मिळेल. इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीसचे कापड बघायला मिळतील. कॉटनपासून ते मलमलच्या कपड्यापर्यंत सगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीसचे कापडं इथे मिळतात.
सलून व्यवसाय करायचा आहे, तर मग हे ठिकाण आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय, मिळतील स्वस्त वस्तू
ब्लाऊज पीसचे कापड आणि किंमत
advertisement
एक मीटर ब्लाऊजच्या कपड्याची किंमत 80 ते 100 रुपयापासून सुरु होते. जे साध्या बाजारात 200 ते 250 रुपयांना मिळतं. ब्रोकेड ब्लाऊजच्या एक मीटरचं कापडाची किंमत 100 रुपयांपासून सुरु होते. तर, खणाच्या कॉटनच्या ब्लाऊज पीसचं 1 मिटर कापडाची किंमत 90 रुपयांसून सुरु होते. तर, बुट्ट्यांच्या ब्लाऊजपीसमध्ये 1 मिटरच्या कपड्याची किंमत 60 ते 70 रुपयांपासून सुरु होते. तसेच किलोवरही तुम्ही इथे ब्लाऊजपीसचे कापड खरेदी करू शकता. 1 मीटर कटपीसची किंमत फक्त 40 रुपयांपासून सुरु होते. जो बाराभावात तुम्हाला 100 रुपयांपासून मिळेल. मुख्य म्हणजे इथे फक्त होलसेलमध्ये नाही तर अगदी रिटेलमध्ये एक पीसही घ्यायचा असल्यास तुम्ही घेऊ शकता. आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत मिळेल.
advertisement
सुंदर नेल एक्सटेंशन करा आता घरच्या घरी: 'इथं' 80 रुपयांपासून खरेदी वस्तू
तसेच चिंधी मार्केटमध्ये 30 ते 40 रुपये मीटर पासून 3 हजार रुपये मीटर पर्यंतचे सगळ्या प्रकारचे फॅब्रिकही पाहायला मिळते. या मार्केटमध्ये फॅब्रिक घेण्यासाठी अनेक फॅशन डिझायनरही येतात. इतकेच नव्हे तर या मार्केटमध्ये फॅब्रिक घेतल्यानंतर कपडे शिवून देखील दिले जातात. मुख्य म्हणजे इथे किलोवर मिळणारे कट पिस फारच स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे मिळतात. त्यामुळे ते 300 रुपये किलोने घ्या किंवा 40 रुपये 1 मीटर घ्या ते परवडणारचं आहे. किलोवर विकताना साधारण 150 रुपये तर काही ठिकाणी 200 ते 300 रुपये किलोही किंमत आहे. 1 ते 2 मिटरचे कटपीस तुम्ही घेऊ शकता. हे सगळे कटपीस वजन करून दिले जातात.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
March 13, 2024 10:18 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कमी बजेटमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊज पीसचा व्यवसाय करायचाय? डोंबिवलीतील ‘हे’ मार्केट आहे खरेदीला बेस्ट पर्याय