advertisement

काव्या मारनने पाकिस्तानी अबरारला टीममध्ये का घेतलं? सनरायझर्सच्या हेड कोचने BCCI वर फोडलं खापर! काय म्हणाला?

Last Updated:

Sunrisers Coach Opens Up On Abrar Ahamad Bid : द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमद याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावरून मोठा वाद पेटलाय.

Sunrisers Coach Opens Up On Abrar Ahamad Bid
Sunrisers Coach Opens Up On Abrar Ahamad Bid
The Hundred Auction Abrar Ahamad : आयपीएलच्या पार्श्वभूमीवर नव्या क्रिकेट लीगमध्ये म्हणजेच द हंड्रेड 2026 मध्ये आता चार भारतीय फ्रँचायझीचा समावेश झाला आहे. मात्र, चेन्नईमधील सन ग्रुपच्या मालकीच्या सनरायझर्स फ्रँचायझीने पहिल्या ऑक्शनमध्ये एक मोठी चूक केली अन् पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. अशातच सनरायझर्सच्या हेड कोचने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सनरायझर्सचं ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड

द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमद याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. सनरायझर्सं फ्रँचायझीने अबरारसाठी तब्बल 190,000 पाउंड म्हणजेच सुमारे 2.34 कोटी रुपये मोजले आहेत. भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं सोशल मीडियावर सध्या वादाला तोंड फुटलंय. सनरायझर्सचं ट्विटर अकाऊंट देखील आता सस्पेन्ड करण्यात आलंय. त्यानंतर आता हेड कोच डॅनियल व्हिटोरी समोर आले.
advertisement

अबरार एक युनिक खेळाडू - डॅनियल व्हिटोरी 

डॅनियल व्हिटोरी यांनी बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, अबरार हा पाकिस्तानी असता तरी देखील एक युनिक खेळाडू असून त्याच्या बॉलिंगमधील व्हेरिएशन्स अनेक डोमेस्टिक खेळाडूंनी यापूर्वी अनुभवलेली नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना पसंती दिली. आमच्यासाठी लिलावात सर्व खेळाडू उपलब्ध होते. पाकिस्तानी खेळाडूंच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चांची आम्हाला कल्पना होती, पण बोर्डाकडून कोणत्याही विशिष्ट सूचना देण्यात आल्या नव्हत्या, असंही व्हिटोरी यांनी म्हटलं आहे.
advertisement

ब्रेक डान्सर उस्मान तारिकला पैशांचा पाऊस

दरम्यान, द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात पैसे मिळतील या आशेने अनेक पाकिस्तानी खेळाडू्ंनी नाव नोंदवलं होतं. पण लिलावात त्यांना कुणी रुपया देणं पसंत केलं नाही. फक्त दोन पाकिस्तानी खेळाडूंवर लिलावात बोली लावण्यात आली. यामध्ये सनराझर्सने घेतलेला अबरार अहमद हा पहिला खेळाडू होता तर उस्मान तारिक हा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला ज्याला बर्मिंगहॅम फिनिक्सने 140,000 पाउंडमध्ये खरेदी केलंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
काव्या मारनने पाकिस्तानी अबरारला टीममध्ये का घेतलं? सनरायझर्सच्या हेड कोचने BCCI वर फोडलं खापर! काय म्हणाला?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement