advertisement

The Hundred Auction : शाहरुख खाननंतर काव्या मारनला 'जोर का झटका', पाकिस्तानी अबरारला संघात घेतल्यानंतर सनरायझर्सवर मोठी कारवाई!

Last Updated:

Sunrisers Leeds official Twitter account suspended : सनराझर्सने अबरारला 255,000 डॉलर्सच्या या मोठ्या रकमेत खरेदी केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काव्या मारनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

Sunrisers Leeds official Twitter account suspended
Sunrisers Leeds official Twitter account suspended
Big Blow to Kavya Maran : क्रिकेटमधील 100 बॉलची सामना असणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेचा लिलाव नुकताच पार पडला. यात चार भारतीय मालकीच्या टीम्सने भाग घेतला होता. या लिलावात काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स फ्रेंचायझीने गुरुवारी पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमद याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. सनरायझर्सच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काव्या मारनवर मोठी टीका होताना दिसतीये. अशातच काव्याला मोठा धक्का बसलाय.

काव्या मारनवर मोठ्या प्रमाणात टीका

सनराझर्सने अबरारला 255,000 डॉलर्सच्या या मोठ्या रकमेत खरेदी केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काव्या मारनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. काव्याने बीसीसीआयचा अलिखित नियम मोडलाय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. लिलावाच्या टेबलवर मुख्य कोच डॅनियल व्हिटोरी याच्यासोबत काव्या मारन देखील होती. त्यावेळी तिने विरोध का केला नाही? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता सनरायझर्सला मोठा फटका बसला आहे.
advertisement

ट्विटर अकाउंट अचानक सस्पेंड

advertisement
अबरारला संघात घेतल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सनरायझर्स लीड्सचे अधिकृत X (ट्विटर) अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं आहे. प्लॅटफॉर्मने याचे नेमकं कारण स्पष्ट केलं नसलं तरी, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संदेश तिथं दिसत आहे. अबरार अहमदच्या निवडीनंतर अवघ्या काही तासांतच हे अकाउंट बंद झाल्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

लीड्स फ्रँचायझीची पूर्ण मालकी

advertisement
गेल्या वर्षी नॉर्दर्न सुपरचार्जर्स म्हणजेच आताच्या लीड्स फ्रँचायझीची पूर्ण मालकी सन टीव्ही या भारतीय माध्यम समूहाने मिळवली होती. सन टीव्हीने इंग्लीश क्रिकेट बोर्डाकडून 49 टक्के आणि यॉर्कशायरकडून उर्वरित 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होता. त्यामुळे त्यांन या डीलचा मोठा फायदा होईल, अशी शक्यता देखील वर्तविली जात होती. अशातच आता एका पाकिस्तानी खेळाडूमुळे त्यांचं ट्विटर अकाऊंट बंद झालं आहे.
advertisement

शाहरुख खानने घेतला होता मोठा निर्णय

दरम्यान, काव्या मारनप्रमाणे शाहरुख खानला देखील मोठी धक्का बसला होता. शाहरुख खान याला देखील मुस्ताफिजूर रहमान याला केकेआरमध्ये घेतल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार प्रकरणानंतर शाहरुख खानच्या केकेआर फ्रँचायझीला मोठा निर्णय घ्यावा लागला होता. केकेआरने मुस्ताफिजूर रहमान याला संघाबाहेर केलं होतं. अशातच आता काव्याला देखील मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
The Hundred Auction : शाहरुख खाननंतर काव्या मारनला 'जोर का झटका', पाकिस्तानी अबरारला संघात घेतल्यानंतर सनरायझर्सवर मोठी कारवाई!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement