अजितदादा विमान अपघाताला नवं वळण, ब्लॅक बॉक्समध्ये छेडछाड, रोहित पवारांचा मोठा आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash: ज्या विमानात अजित पवारांचा अपघात झाला. त्या विमानाच्या ब्लॅकबॉक्समध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग छेडछाड करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते व्हीएसआरच्या खासगी विमानाने मुंबईहून बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर लँडींग करत असताना अजितदादांच्या विमानाला अपघात झाला. यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. मात्र आता या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. अजित दादांच्या विमानाला अपघात झाला असून हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या कटात व्हीएसआर कंपनी आणि काही राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत सीआयडीकडून योग्य प्रकारे तपास केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
advertisement
या सगळ्या घडामोडीनंतर आता रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्या विमानात अजित पवारांचा अपघात झाला. त्या विमानाच्या ब्लॅकबॉक्समध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग छेडछाड करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ब्लॅकबॉक्समधील संवेदनशील माहिती एडीट केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून त्यांनी याबाबतचा आरोप केला.
advertisement
एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे."

रोहित पवारांची एक्स अकाऊंटवरील पोस्ट
advertisement
"DGCA किंवा AAIB मधील जे कुणी यासाठी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी फॉरेन्सिक ऑडीटमध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात फॉरेन्सिक ऑडीट झाले, जे होणारच आहे, तेव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत, हेही लक्षात असू द्यावं," असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवारांच्या पोस्टनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा विमान अपघाताला नवं वळण, ब्लॅक बॉक्समध्ये छेडछाड, रोहित पवारांचा मोठा आरोप









