सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल येथे चेतन बोडा राहण्यास आहे. एका नामांकित फार्मसी कंपनीमध्ये तो कामाला आहे. नोकरी करत असताना पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी चेतन यांनी काम करत करत स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर माहिती मिळवून त्यांनी कर्णिक नगर येथे फ्रुट बाउल आणि फ्रुट बॉक्स हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका बाऊलमध्ये आठ ते दहा फ्रुट कट करून मिक्स करून ग्राहकांना दिला जातो.
advertisement
Success Story : नोकरी सोडली, चहा विकला, आता निलेश बनला रेस्टॉरंटचा मालक, वर्षाला 80 लाखांची उलाढाल
आठ ते दहा मिक्स करून दिलेल्या एका बाउलची किंमत 30 रुपये इतकी आहे. आज-काल धावपळीच्या जीवनात नागरिक निरोगी राहण्यासाठी फळ आहार घेत आहेत. पण त्यांना एकाच वेळी सर्वच फळे खाता येत नाहीत, म्हणून चेतन याने हा फ्रुट मिक्स बाउल व्यवसाय सुरू केला आहे. तर दररोज 30 ते 40 प्लेट विक्री होत आहे. हा व्यवसाय तीन ते चार महिन्यांपूर्वी सुरू केला असून सर्व खर्च वजा करून चेतन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहे.
मिक्स फ्रूट बाउलमध्ये केळी, सफरचंद, अंजीर, डाळिंब, अननस, संत्रा आदी फळे मिक्स करून ग्राहकांना खाण्यासाठी देत आहे. दररोज सकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा फ्रुट विक्रीचा व्यवसाय चेतन करत आहे. तसेच चेतन यांच्याकडे घरपोच सुद्धा दिलं जातं. क्लासिक 60 बॉक्स महिन्याला घरपोच मिळणार असून त्याची किंमत 1399 रुपये इतकी आहे. तर या बॉक्समध्ये 2 फ्रुट्स आणि 3 व्हेजिटेबल असणार आहे.
ॲक्टिव्ह बॉक्स महिन्याला 80 घरपोच मिळणार असून त्याची किंमत 1999 रुपये इतकी आहे. तर या बॉक्समध्ये 3 फ्रुट्स, 3 व्हेजिटेबल आणि एक सॅलड असणार आहे. तर प्रीमियम बॉक्सची किंमत 2599 रुपये इतकी असून महिन्याला 100 बॉक्स घरपोच मिळणार आहे. यामध्ये 5 फ्रुट आणि 3 व्हेजिटेबल असणार आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर न लाजता तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, आज नाहीतर उद्या कष्टाचे फळ नक्की मिळेल, असा सल्ला फार्मसीपर्यंत शिक्षण झालेला तरुण चेतन बोडा यांनी दिला आहे.