TRENDING:

सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ; सापडला 3,900 टन सोन्याचा साठा, किंमती धाडकन कोसळणार का? जगाचे डोळे विस्फारले

Last Updated:

Gold News: चीनमध्ये समुद्राखाली आशियातील सर्वात मोठ्या सोन्याचा साठा सापडल्याने जागतिक गोल्ड मार्केटमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मात्र हा खजिना तात्काळ बाजारात येणार नसल्याने सोन्याच्या किमतींवर लगेच परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

advertisement
News18
News18
advertisement

तुम्ही बातमी वाचता की, समुद्राच्या तळाशी प्रचंड मोठा सोन्याचा साठा सापडला आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष तिकडे वळतं… होय, असंच काहीसं घडलं आहे.

2025 हे वर्ष संपण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक असताना ही बातमी समोर आली आणि यामुळे जागतिक पातळीवर एकच खळबळ उडाली. आशियातील समुद्राखालील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडल्याचे चीनकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे जागतिक गोल्ड मार्केटमध्ये चर्चांना उधाण आलं. साहजिकच सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाले.

advertisement

हे सोनं कधी बाहेर काढलं जाईल? ते बाजारात येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं यामुळे सोनं स्वस्त होईल का?

समजा, सकाळी चहा घेताना तुम्ही बातमी वाचताआशियातील सर्वात मोठा अंडरसी सोन्याचा साठा सापडला!” तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? “आता तर सोन्याचे दर पडणार!” पण ही गोष्ट इतकी सरळ नाही.

advertisement

चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी, गुंतवणूकदारांनी काय करावे? गंभीर इशारा

सोन्याची ही स्टोरी सुरू होते चीनच्या शांडोंग प्रांतात. Jiaodong Peninsula जवळील Laizhou या भागात 19 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान आशियातील सर्वात मोठ्या अंडरसी सोन्याच्या साठा सापडल्याचे वृत्त समोर आले. याची अधिकृत घोषणा Yantai Government ने 24 डिसेंबरच्या संध्याकाळी केली. ही शोधमोहीम खास यासाठी ठरली, कारण चीनमधील ही पहिली पूर्णतः कन्फर्म अंडरसी गोल्ड सर्च मानला जात आहे.

advertisement

हा खजाना किती मोठा आहे?

Laizhou गोल्ड बेल्टमध्ये अंदाजे 3,900 टन सोनं असल्याचं सांगितलं जातं. हे चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या जवळपास 26 टक्के आहे. म्हणजेच Laizhou हा आता चीनमधील नंबर-1 गोल्ड रिझर्व्ह आणि उत्पादन क्षेत्र ठरतो. जरी हे संपूर्ण सोनं समुद्राखालीच आहे की काही भाग जमिनीखाली आहे, हे स्पष्ट नसले तरी धोरणात्मक दृष्टिकोनातून या शोधाचं महत्त्व फार मोठं आहे.

advertisement

आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे सोनं उद्या बाजारात येणार का? उत्तर आहे नाही, अजिबात नाही.

अंडरसी माइनिंग म्हणजे समुद्राखालून सोनं काढणं हे अत्यंत अवघड काम आहे. CNBC International च्या अहवालानुसार, यासाठी अत्याधुनिक डीप-सी तंत्रज्ञान लागतं, पर्यावरण परवानग्या मोठा अडथळा ठरतात, खर्च खूप जास्त असतो आणि सुरक्षिततेचे धोकेही प्रचंड असतात. याच कारणामुळे चीनकडून अजून कोणतीही अधिकृत उत्पादन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली नाही.

मग उत्पादन कधी सुरू होईल?

तज्ज्ञांच्या मते, या सोन्याचं प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यासाठी 5 ते 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच 2030 ते 2035 दरम्यान कुठेतरी. चीन आधीच Liaoning आणि Kunlun सारख्या मोठ्या गोल्ड प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, पण अंडरसी माइनिंग ही त्याहूनही अधिक कठीण प्रक्रिया आहे. त्यामुळे लवकर उत्पादन होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल.

आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यामुळे सोनं स्वस्त होईल का? थोडक्यात सांगायचं तर, सध्या नाही.

शॉर्ट टर्ममध्ये या शोधाचा सोन्याच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण ही फक्त शोधाची बातमी आहे, पुरवठा वाढलेला नाही. सध्या सोन्याचे दर हे जागतिक तणाव, युद्धस्थिती, सेंट्रल बँकांची खरेदी आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षा या गोष्टींच्या आधारे ठरवले जात आहेत.

लॉन्ग टर्ममध्ये मात्र चित्र थोडं बदलू शकतं.

जर 203035 नंतर चीन या साठ्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन करू लागला, तर जागतिक सोन्याच्या पुरवठ्यात साधारण 1 ते 2 टक्क्यांची वाढ होऊ शकते. अशा वेळी, जेव्हा सोन्याचे दर प्रति औंस 4,500 डॉलरच्या आसपास असतील, तेव्हा फार दीर्घकाळात किंमतींवर थोडासा दबाव दिसू शकतो.

पण सध्या सोन्यात जी तेजी आहे. त्यामध्ये या बातमीमुळे कोणताही फरक पडणार नाही. आज सोन्याच्या किंमती युद्ध, जागतिक तणाव, सेंट्रल बँकांची खरेदी आणि व्याजदर कपातीच्या शक्यता यावर ठरत आहेत. समुद्राखाली दडलेलं हे सोनं आत्तासाठी फक्त एक रंजक कथा आहे, बाजारातील किंमत कमी करण्यासाठी नाही.

मराठी बातम्या/मनी/
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ; सापडला 3,900 टन सोन्याचा साठा, किंमती धाडकन कोसळणार का? जगाचे डोळे विस्फारले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल