धोकादायक काळ, चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी, गुंतवणूकदारांनी काय करावे? दिग्गज लेखकाचा गंभीर इशारा

Last Updated:

Silver Price: ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी डॉलर कोसळण्याचा आणि भीषण महागाईचा इशारा देत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण केली आहे. चांदीचे दर 200 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करत त्यांनी सध्याचा काळ अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या पोस्टमधून गुंतवणूकदारांना सल्ले देत असतात. त्यांच्या बहुतांश पोस्टमध्ये सोने, चांदी आणि बिटकॉइन यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी विशेषतः चांदीवर लक्ष केंद्रित केले आहे.
advertisement
कियोसाकी याआधीही अनेक वेळा चांदीमुळे लोक श्रीमंत झाले असल्याचे सांगत आले आहेत. आता त्यांनी एका नव्या पोस्टमध्ये थेट सांगितले आहे की, पुढील वर्षी चांदीचा दर 200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आत्ताच खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी एक गंभीर इशाराही दिला असून, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचा उल्लेख करत “आपण अत्यंत धोकादायक काळात जगत आहोत” असे म्हटले आहे.
advertisement
‘सोने-चांदी ठेवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी’
आपल्या नव्या पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी अमेरिकन डॉलरची किंमत सतत घसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले की, चांदीचा दर 70 डॉलरच्या पुढे गेला आहे. हे सोने-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पण केवळ कागदी पैशांवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी वाईट आहे.
advertisement
कियोसाकी म्हणाले की, जर चांदीचा दर असा वाढत राहिला; तर पुढील काही वर्षांत हायपर इन्फ्लेशन म्हणजे प्रचंड महागाई येण्याचे संकेत मिळू शकतात. कारण अमेरिकन डॉलरची ताकद हळूहळू कमी होत चालली आहे.
डॉलर घसरणार, चांदी वाढणार
कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या चांदी सुमारे 70 डॉलर प्रति औंस आहे. पण 2026 पर्यंत ती 200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. त्यांनी गुंतवणूकदारांना डॉलरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. “पराभूत खेळाडू होऊ नका. डॉलरची ताकद कमी होत राहील, स्वतःची काळजी घ्या,” असे त्यांनी म्हटले आहे.
advertisement
त्यांनी हेही सांगितले की, 2024 मध्ये चांदीचा दर फक्त 20 डॉलर होता आणि इतक्या कमी वेळेत त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या मते, ही वाढ पुढेही सुरू राहू शकते.
भारतातही चांदीच्या दरात मोठी उसळी
फक्त आंतरराष्ट्रीय बाजारातच नाही, तर भारतामध्येही चांदीचे दर झपाट्याने वाढत आहेत. MCX आणि स्थानिक बाजारात चांदीने 2025 संपेपर्यंत मोठी झेप घेतली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी 1 किलो चांदीचा दर 2,18,983 रुपये इतका झाला होता. एका दिवसातच चांदीच्या किमतीत 7,983 रुपयांची वाढ झाली.
advertisement
याआधी मंगळवारी चांदीचा दर 2,11,000 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच एका दिवसातच मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.
वॉरेन बफेंबाबतही महत्त्वाचे विधान
कियोसाकी यांनी आणखी एका पोस्टमध्ये जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, “वॉरेन बफे यांचे पॉडकास्ट खूप छान असतात. मी रोज त्यांचे विचार ऐकतो.”
advertisement
कियोसाकी यांच्या मते, वॉरेन बफे यांनी AI बबल, शेअर बाजारातील फुगा आणि जागतिक कर्ज हे सध्या गुंतवणुकीसाठी आणि जीवनासाठी सर्वात मोठे धोके असल्याचे सांगितले आहे. “आपण खरोखरच धोकादायक काळात जगत आहोत. त्यामुळे भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर अनुभवी आणि बुद्धिमान लोकांचे ऐकणे गरजेचे आहे,” असे कियोसाकी यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
धोकादायक काळ, चांदीच्या दराबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी, गुंतवणूकदारांनी काय करावे? दिग्गज लेखकाचा गंभीर इशारा
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement