TRENDING:

12 रुपयांची सिगरेट 72ला नाही तर कितीला मिळणार? Actual Priceचे संपूर्ण गणित समजून घ्या, Inside story

Last Updated:

Cigarettes Actual Price: सिगरेटच्या किमती 72 रुपयांपर्यंत जाण्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच सरकारच्या नव्या कररचनेमुळे नेमकी किती वाढ होणार, याबाबत स्पष्टता समोर आली आहे. एक्साइज ड्यूटी वाढल्याने सिगरेट महागणार खरी, मात्र दरवाढीचं खरं गणित वेगळंच आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: पुढील महिन्यापासून सिगरेटच्या किमतींमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने वाढवलेली एक्साइज ड्यूटी. यासंदर्भात 31 डिसेंबर रोजी सरकारकडून अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी करण्यात आली आहे.

advertisement

या अधिसूचनेनुसार,1 फेब्रुवारी 2026 पासून सिगरेटच्या प्रति 1,000 स्टिक्सवर 2,050 ते 8,500 इतकी एक्साइज ड्यूटी आकारली जाणार आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या वाढीव कराचा भार कमी करण्यासाठी सिगरेट उत्पादक कंपन्या थेट सिगरेटच्या किरकोळ किमती वाढवू शकतात.

advertisement

सेस हटवला, पण एक्साइज ड्यूटी वाढवली

आतापर्यंत सिगरेटवर 28% GST सोबत ‘कंपेन्सेशन सेसआकारला जात होता. त्यामुळे सिगरेटवरील एकूण कर 50% पेक्षा जास्त होत होता. मात्र 3 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या बदलांनंतर सिगरेटवरील GST 40% करण्यात आला, पण त्याच वेळी कंपेन्सेशन सेस पूर्णपणे रद्द करण्यात आला.

advertisement

या नव्या कररचना फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहेत.

जर सरकारने एक्साइज ड्यूटी वाढवली नसती, तर सिगरेट प्रत्यक्षात स्वस्त झाली असती. मात्र सरकारी महसूल टिकवून ठेवण्यासाठी, सेसच्या जागी आता कायमस्वरूपी (परमनंट) एक्साइज ड्यूटी लागू करण्यात आली आहे.

advertisement

ही नवी एक्साइज ड्यूटी 2,050 ते 8,500 प्रति 1,000 सिगरेट इतकी निश्चित करण्यात आली असून, ती जुन्या कररचनेपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.

सिगरेटच्या किमती का वाढू शकतात?

1) वाढलेली एक्साइज ड्यूटी

सरकारने लागू केलेली नवी एक्साइज ड्यूटी ही जुन्या सेसपेक्षा जास्त आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जर सरकारने 5 चा सेस काढून टाकला, तर त्याच्या बदल्यात 8 ची एक्साइज ड्यूटी लावली आहे. म्हणजेच कराचा एकूण भार कमी होण्याऐवजी अधिक वाढला आहे.

2) ‘डबल टॅक्स’चा परिणाम

एक्साइज ड्यूटी ही उत्पादन खर्चात (Manufacturing Cost) समाविष्ट होते. म्हणजे सिगरेट कारखान्यातून बाहेर पडते, तेव्हाच तिच्यावर एक्साइज ड्यूटी लावलेली असते. यानंतर त्या वाढलेल्या किमतीवर GST आकारला जातो. यामुळे ‘टॅक्सवर टॅक्सअशी परिस्थिती निर्माण होते आणि परिणामी सिगरेटची अंतिम MRP अधिक वाढते.

उदाहरणातून समजून घेऊयात

समजा, याआधी एका सिगरेट स्टिकवर एकूण कर (GST + सेस) 6 होता.

आता सेस काढून टाकला: 2

नवी एक्साइज ड्यूटी लागू झाली: +4

म्हणजे आता एकूण कर 8 झाला.

त्यामुळे करात 2 ची वाढ झाली आणि याच कारणामुळे 15 ची सिगरेट 17 किंवा 18 पर्यंत महाग होऊ शकते.

ITC चे शेअर्स 6 वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीत

करवाढीच्या बातमीचा परिणाम शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला. देशातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनी ITC चे शेअर्स एका दिवसात 10% पर्यंत घसरले. ही 2020 नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

त्याचप्रमाणे मार्लबोरोसारख्या सिगरेट ब्रँडची विक्री करणाऱ्या गॉडफ्रे फिलिप्स या कंपनीचे शेअर्सही 17.6% पर्यंत कोसळले. गुंतवणूकदारांना भीती आहे की, सिगरेटच्या किमती वाढल्यास विक्री घटू शकते. ज्याचा थेट परिणाम या कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/
12 रुपयांची सिगरेट 72ला नाही तर कितीला मिळणार? Actual Priceचे संपूर्ण गणित समजून घ्या, Inside story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल