अनपेक्षित आणि विचित्र मेसेज
हरनूरला एका अनोळखी व्यक्तीकडून लिंक्डइनवर एक 'कनेक्शन रिक्वेस्ट' आली. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तिला जो मेसेज मिळाला तो संपूर्णत: व्यावसायिक चौकटीबाहेरचा होता. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं – मी तुला माझं क्रेडिट कार्ड १० सेकंदांसाठी पाठवत आहे. तुझं नेट स्पीड असेल तर शॉपिंग कर.
हा मेसेज केवळ अजबच नव्हता तर तो लिंक्डइनसारख्या व्यावसायिक व्यासपीठवर अनपेक्षित होता. हरनूर म्हणते, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला नेमके काय टेस्ट करायचे होते? माझ्या इंटरनेटचा स्पीड, माझी नैतिकता की स्क्विड गेम सारखा वेग?
advertisement
हरनूरने त्या दहा सेकंदांत तिच्या मनात काय विचार आले ते देखील शेअर केले आहे. ती म्हणते, मी स्टँडिंग डेस्क खरेदीच्या विचार केला – महिलांसाठी उभं राहण्यासाठी! किंवा मायक्रोफोन विकत घेऊन या प्रसंगावर पॉडकास्ट करावा का हे ठरवत होते. अखेरची टॅब बंद करून अशा लोकांपासून पळण्याचा विचार केला.
शेवटी हरनूर म्हणते- जर तुझ्या मते क्रेडिट कार्ड पाठवणं म्हणजे 'नेटवर्किंग' असेल. तर लक्षात ठेव. माझं इंटरनेट फास्ट आहे. पण माझी नैतिकता त्याहूनही फास्ट आहे.
हरनूरच्या या पोस्टनंतर शेकडो लोकांनी तिला पाठिंबा दिला. तिचं कौतुक केलं आणि काहींनी स्वतःचे असेच अनुभव शेअर केले.
एका व्यक्तीने गंमतीने लिहिलं – कमीत कमी १० मिनिटं तरी पाठवायचं होतं!
हरनूरने उत्तर दिलं – १० मिनिटंही पुरेशी थेरपी मिळवून देऊ शकणार नाहीत.
अनेकांनी लिहिलं – "प्राउड ऑफ यू"
काही महिला वापरकर्त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर करत सांगितलं की, एका इन्फ्लुएन्सरने मला मेसेज केला की मी त्याच्या पोस्टवर कमेंट केली म्हणून तो मला पैसे ट्रान्सफर करू इच्छितो.मी दोन वेळा नकार दिला. तरी तो पाठपुरावा करत राहिला. शेवटी ब्लॉक केलं.