बदलापुरातील दाम्पत्याचा अनोखा प्रयोग -
गीतांजली पाटील सोनावले आणि राहुल पाटील असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहतात. हे दाम्पत्याने त्यांच्या गच्चीवरच एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. हो तुम्ही वाचत आहात, ते खरे आहे. या दाम्पत्याने त्यांच्या घराच्या गच्चीवरच नवीन व्यवसाय सुरू केला आहे. इमिटेशन ज्वेलरी, एथनिक क्लॉदिग आणि विविध प्रकारचे एथिनिक ड्रेस मटेरिअल, कुर्ती, स्कार्फ आणि हिजाब, क्लचर, नेल पॉलिश, लिपस्टिक्स, विविध प्रकारचे इअरिंग्स, तसेच विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे बदलापुरातच तुम्ही असाल तर त्यांच्या माध्यमातून फ्री होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली आहे.
advertisement
रिविव्ह जेन्यूइन फॅशन या नावाने राहुल पाटील आणि गितांजली या दाम्पत्याने हा व्यवसाय सुरू केला आहे. या दोघांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला अगदी अल्पावधीच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गितांजली पाटील यांनी न्यूज18 लोकल सोबत बोलताना सांगितले.
काय या यामागचा उद्देश्य -
राहुल आणि गितांजली यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. हा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांच्या उद्देश्य असा आहे की, कमीत कमी रेंजमध्ये, स्वस्तात आणि परवडणाऱ्या अत्यंत चांगल्या दर्जाच्या वस्तू लोकांना उपलब्ध करुन देणे. राहुल आणि गितांजली हे दोन्ही जण जॉबही करतात. पण सर्वांना एका चांगल्या दर्जाची उत्पादने दूर न जाता आपल्या जवळच्या जवळ परवडणाऱ्या दरात मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. या हेतूनेच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
यासोबतच त्या म्हणाल्या की, आजच्या काळात अनेकांना असे वाटते की व्यवसाय सुरू करायचा असेल तर मोठा सेटअप लागतो, लाखो रुपये गुंतवावे लागतात, मार्केटमध्ये जागा घ्यावी लागते. मात्र, या सर्व बाबींना या दोघांनी छेद चक्क गच्चीवर आपला व्यवसाय सुरू केला आहे. गच्चीचा इतक्या अनोख्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने वापर कसा करता येतो, हेसुद्धा या राहुल आणि गीतांजली या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. गीतांजली या नोकरी करत असताना सीएसआरच्या माध्यमातून विविध ठिकाणी सहभाग घेत असतात. त्यानंतर त्यांनी आता आपली हीच आवडीला चालना देण्यासाठी हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
कुठे संपर्क करावा -
आता ग्राहकांना मुंबईला जायची गरज भासणार नाही, त्याऐवजी रिविव्ह जेन्यूइन फॅशन या शॉपच्या माध्यमातून घरपोच लाभ घेता येणार आहे. तुम्हालाही जर अगदी कमी पैशांमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाची उत्पादने हवी असतील तर तुम्ही मोहन विलोस, फेज 2, बी2 602, भोसले नगर, शिरगाव, बदलपूर पूर्व या पत्त्यावर किंवा 8830504735, 8850271412 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही या विविध प्रकारच्या उत्पादने खरेदी करू शकतात. राहुल आणि गीतांजली या दाम्पत्याने घेतलेल्या या अनोख्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
