TRENDING:

CRPF जवानला 10 कोटींची Income Tax नोटिस, गुपचुप सुरु होता असा खेळ, सत्य ऐकाल तर तुम्हालाही बसेल धक्का

Last Updated:

विशेष कुमार कश्यप यांना आयकर विभागाकडून तब्बल ₹10.51 कोटींच्या टर्नओव्हरचा नोटीस मिळाली, तेव्हा ते अक्षरशः हादरले. त्यांनी कधी कोणती कंपनी सुरू केली नव्हती आणि एवढ्या मोठ्या व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल युगात ओळख चोरी (Identity Theft) हा एक गंभीर आणि वाढता धोका बनला आहे. एखाद्याचा PAN कार्ड, आधार नंबर किंवा बँक माहितीचा गैरवापर करुन फसवणूक करण्याची प्रकरणं आता शहरापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती ग्रामीण भागातही पोहोचली आहेत. याचाच ताजा आणि धक्कादायक उदाहरण म्हणजे छत्तीसगडमधील बस्तर येथे तैनात असलेल्या CRPF जवान विशेष कुमार कश्यप यांच्याशी घडलेली घटना.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

विशेष कुमार कश्यप यांना आयकर विभागाकडून तब्बल ₹10.51 कोटींच्या टर्नओव्हरचा नोटीस मिळाली, तेव्हा ते अक्षरशः हादरले. त्यांनी कधी कोणती कंपनी सुरू केली नव्हती आणि एवढ्या मोठ्या व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. मात्र तपासात स्पष्ट झालं की, कुणीतरी त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर बनावट कंपनी उघडली होती.

2019-20 आणि 2020-21 च्या व्यवहारांवरून उघड झालं रहस्य

advertisement

आयकर विभागाने ही नोटीस 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षातील व्यवहारांच्या आधारे पाठवली होती. चौकशीत आढळलं की काही फसवणूक करणाऱ्यांनी कश्यप यांच्या ओळखीचा वापर करून कंपनी नोंदवली आणि कोट्यवधींचे व्यवहार केले. ही बाब लक्षात आल्यानंतर जवानाने बकावंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (IPC) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

advertisement

बस्तर साइबर सेलच्या प्रभारी गीतिका साहू यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात कोलकाता येथील एका फर्मचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. संशय आहे की, याच फर्मने जवानाच्या पॅन कार्डच्या आधारे मोठ्या आर्थिक व्यवहारांची आखणी केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बँक खात्यांची आणि दस्तऐवजांची मागणी केली, व्यवहार कुठून आणि कसे झाले हे शोधण्याचे काम सुरू आहे.

advertisement

ओळख चोरी आणि ‘शेल कंपन्यांचा’ डाव

तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण ओळख चोरी आणि शेल कंपन्यांच्या जाळ्याशी संबंधित असू शकतं. त्या जवानाचं पॅन कार्ड चुकीन चुकीच्या हातात आलं आणि त्याचा गैरवापर झाला, पण आता हे कसं झालं? काय झालं हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, "ही संपूर्ण घटना एका संघटित टोळीच्या सखोल साजिशीचा भाग वाटते. आयकर विभाग आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने तपास वेगाने सुरू आहे."

advertisement

या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे. आपली आर्थिक माहिती खरंच किती सुरक्षित आहे?

ओळख चोरी आता केवळ शहरी भागापुरती मर्यादित नाही, तर ती गावागावात पोहोचली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली वैयक्तिक माहिती, पॅन कार्ड आणि आधार क्रमांक सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे. थोडी सावधगिरी आणि जागरूकता दाखवली, तर अशा मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो.

मराठी बातम्या/मनी/
CRPF जवानला 10 कोटींची Income Tax नोटिस, गुपचुप सुरु होता असा खेळ, सत्य ऐकाल तर तुम्हालाही बसेल धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल