छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरामध्ये सोमेश डीघुळे राहत आहे. सोमेश हा जन्मताच कर्णबधिर आहे. सोमेश जरी कर्णबधिर होता तरी देखील त्याच्या आई-वडिलांनी तसेच सर्व शिक्षण आहे ते सामान्य मुलांच्या शाळेमधून केलेले आहे. सोमेशने देवगिरी महाविद्यालयातून BA शिक्षण घेतले.
Agriculture Success: 20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
advertisement
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमेशला नोकरी करण्याची इच्छा होती. पण तो कर्णबधिर असल्यामुळे नोकरी मिळत नव्हती त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पण त्यामध्ये देखील यश आले नाही त्यामुळे त्याने ठरवले की आपण व्यवसाय करावा. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचा विश्व सुगंध नॅचरल नावाने स्वतःचा एक शुद्ध तेल घाणा व्यवसाय सुरू केला.
सध्याला यांच्याकडे सात ते आठ प्रकारचे विविध तेल मिळतात. यामध्ये सूर्यफूल, करडी, खोबरेल तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल अशा प्रकारचे सर्व तेल विक्रीसाठी आहेत. यामध्ये त्यांना त्यांची पत्नी, त्यांचे आई-वडील दोघेही मदत करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. सर्व तेल ते स्वतः काढतात, त्यांची पॅकेजिंग करून स्वतःच ते विक्री करतात. त्यांचे बीड बायपास परिसरामध्ये दुकान आहे.
सोमेशला त्याच्या स्वप्नामधील BMW गाडी घ्यायची आहे. यासाठी तो खूप मेहनत करत आहे. आमच्या सूनबाई देखील त्याला यासाठी खूप मदत करतात. आमचे आशीर्वाद नेहमी त्याच्या सोबत आहेत, असे सोमेशचे आई-वडील म्हणाले आहे.