Bandhan Bank वर Motilal Oswal चा विश्वास कायम
Motilal Oswal ने Bandhan Bank वर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 175 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. सध्याच्या भावाच्या तुलनेत यामध्ये सुमारे 23 टक्के वाढीची संधी दिसत आहे. ब्रोकरेजच्या मते, मागील काही वर्षांपासून बँक एनपीए (खराब कर्ज) समस्येमुळे त्रस्त होती, ज्याचा परिणाम बँकेच्या वाढीवर आणि नफ्यावर झाला. मात्र आता हा नकारात्मक चक्र हळूहळू संपत असून, पुढील काळात परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
advertisement
Eternal वर ‘Buy’ रेटिंग
फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, JM Financial ने Eternal या शेअरवर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 400 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. सध्याच्या भावाच्या तुलनेत यामध्ये तब्बल 54 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रोकरेजच्या मते, डिसेंबर तिमाही Eternal साठी अत्यंत महत्त्वाची ठरली. कंपनीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit ने अपेक्षेपेक्षा दोन तिमाही आधीच Adjusted EBITDA breakeven गाठले आहे. Blinkit ची नेट ऑर्डर व्हॅल्यू वार्षिक आधारावर 121 टक्क्यांनी वाढली, ज्यामागे वाढते ऑर्डर्स आणि मजबूत युजर बेस कारणीभूत ठरले. तसेच Eternal च्या फूड डिलिव्हरी व्यवसायाची वाढ आणि नफा अपेक्षेपेक्षा चांगला राहिला.
Nuvama आणि Motilal Oswal यांची या शेअर्सवर पसंती
Nuvama Wealth Management ने United Spirits वर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवले असले तरी त्याचा टार्गेट प्राइस कमी करून 1,660 रुपये केला आहे. तरीही शेअरमध्ये सुमारे 25 टक्क्यांची वाढीची संधी असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत वार्षिक आधारावर 3.2 टक्क्यांची घट झाली असून, यामागे महाराष्ट्रातील धोरणात्मक बदल आणि आंध्र प्रदेशातील मागील वर्षीचे तात्पुरते स्टॉकिंग कारणीभूत ठरले आहे. मात्र व्यवस्थापनाच्या मते परिस्थिती हळूहळू सुधारू शकते आणि मार्जिन स्थिर राहण्याची शक्यता आहे.
याचबरोबर Nuvama ने JSW Infrastructure वरही ‘Buy’ रेटिंग कायम ठेवली असून 360 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे, जो सध्याच्या भावापेक्षा सुमारे 40 टक्के अधिक आहे. Q3 मध्ये कंपनीचा कामगिरी अंदाजानुसार राहिली. ऑपरेशनल रेव्हेन्यू, EBITDA आणि नफ्यात वार्षिक आधारावर चांगली वाढ नोंदवली गेली. काही पोर्ट्सवर व्हॉल्युम कमी राहिला असला तरी अनेक पोर्ट्सवरील कार्गो ग्रोथने कंपनीला पाठबळ दिले.
Supreme Industries आणि Indian Hotels वर सकारात्मक दृष्टीकोन
Motilal Oswal ने Supreme Industries वर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 4,200 रुपयांचा टार्गेट दिला आहे. यामुळे सुमारे 25 टक्क्यांहून अधिक अपसाइड दिसतो. Q3 मध्ये कंपनीचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा थोडा कमी राहिला असला तरी EBITDA मध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली, जी मागील पाच तिमाहींतील पहिली वाढ होती. व्हॉल्युम ग्रोथ मजबूत राहिली; मात्र PVC किमतीतील चढ-उतारांमुळे मार्जिनवर दबाव दिसून आला.
Motilal Oswal ने Indian Hotels Company वरही ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 850 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. ज्यामध्ये सुमारे 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेजच्या मते, कंपनीचा एकूण आउटलुक मजबूत असून कोर बिझनेससह नवीन व्यवसायांमधूनही चांगली वाढ मिळत आहे.
LTIMindtree आणि Havells वर ब्रोकरेजचा भरवसा
Motilal Oswal ने LTIMindtree वर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवून 7,900 रुपयांचा टार्गेट दिला आहे. Q3 मध्ये कंपनीने 1.2 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न नोंदवले, जे अंदाजापेक्षा चांगले होते. मागील दोन तिमाहींमध्ये दिसलेली गती पुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे.
दरम्यान Goldman Sachs ने Havells India वर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 1,880 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. ज्यामुळे सुमारे 30 टक्क्यांची वाढ शक्य आहे. ब्रोकरेजच्या मते मागणी हळूहळू स्थिर होत असून कंपनीचा बिझनेस मिक्स अधिक चांगला होत आहे. Q3 मध्ये Havells च्या उत्पन्नात 14 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली, जी तुलनेने कमकुवत सीझन असूनही चांगली मानली जात आहे.
IndiGo आणि LG Electronics India वर ‘Buy’ कॉल
Motilal Oswal ने IndiGo वरही ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 6,100 रुपयांचा टार्गेट प्राइस दिला आहे. यामध्ये सुमारे 24 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेजच्या मते एअरलाईन आता कॅपॅसिटी ग्रोथ संतुलित करत असून, त्यामुळे अल्पकालीन मार्जिनवर थोडा दबाव येऊ शकतो. मात्र पुढील काळात स्थिरता येण्याची शक्यता आहे. FY26 मध्ये युनिट कॉस्टमध्ये किरकोळ वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान JM Financial ने प्रथमच LG Electronics India वर कव्हरेज सुरू करत ‘Buy’ रेटिंग दिली आहे. कंपनीसाठी 1,630 रुपयांचा टार्गेट प्राइस ठेवण्यात आला असून, सुमारे 19 टक्क्यांची वाढीची संधी दिसत आहे. ब्रोकरेजच्या मते कंपनीची बाजारातील मजबूत पकड, पॅरेंट कंपनीचा पाठिंबा आणि भक्कम फंडामेंटल्स ही तिची प्रमुख ताकद आहे.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
