कोरोना काळात हाताला काम राहिले नाही. रोजंदार म्हणून देखील कोणी काम देत नव्हते. घरी खाण्याची देखील आबाळ होऊ लागली. काय करावं या विचारात असताना एकाने निम पेस्ट तयार करण्याची कल्पना सांगितली. त्यानंतर बदनापूर इथे प्रशिक्षण घेऊन निम साबण निर्मितीचा गृह उद्योग सुरु केला.
Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, 13 गुंठ्यात केली घेवड्याची लागवड, उत्पन्न मिळणार लाखात! Video
advertisement
आता या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 11 कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यात कुरिअर द्वारे निम साबण पोहोच केली जाते. 150 रूपयांना दोन अशी या साबणाची किंमत आहे. महिन्याला 1000 साबणांची विक्री होत असून 1 लाख रुपयांची उलाढाल तर 50 हजार रुपये निव्वळ नफा राहत असल्याचे ज्ञानेश्वर गव्हाड यांनी सांगितले.
या साबण निर्मितीसाठी भोकर, निम पावडर, रीठा, पळस, पळस फुल पावडर, चिंचोका पावडर, आणि सुगंधी परफ्युम हे घटक वापरले जातात. सर्व नैसर्गिक घटक असल्याने या साबणाचे शून्य साईड इफेक्ट आहेत. अन् त्वचारोगावर ही साबण गुणकारी असल्याचे गव्हाड यांनी सांगितले.