TRENDING:

Donald Trump Announce Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक, औषध कंपन्यांसह कोणत्या भारतीय कंपन्यावर होणार परिणाम?

Last Updated:

Donald Trump Announce Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर वाढीचा परीघ वाढवला असून आता औषध कंपन्यांसह इतरही कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे.

advertisement
ट्रम्प यांचा पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक, औषध कंपन्यांसह कोणत्या भारतीय कंपन्यावर होणार परिणाम?
ट्रम्प यांचा पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक, औषध कंपन्यांसह कोणत्या भारतीय कंपन्यावर होणार परिणाम?
advertisement

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर वाढीचा परीघ वाढवला असून आता औषध कंपन्यांसह इतरही कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे. एक ऑक्टोबरपासून हे नवीन व्यापार कर लागू लावण्यात येणार आहे.

advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबरपासून परदेशी औषधी, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर आणि ट्रकवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया याची घोषणा केली आहे. हा निर्णय म्हणजे देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी सांगितले की औषधी औषधांवर 100 टक्के कर, स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50 टक्के कर, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30 कर आणि जड ट्रकवर 25 कर लागू होणार आहे.

advertisement

ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "1ऑक्टोबर 2025 पासून, आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर 100 टक्के कर आकारणार आहोत. जर कंपन्या अमेरिकेत उत्पादन करणार असतील तरच त्यांना कर सवलत लागू होईल. जर या कंपन्यांचे कारखाने अंडर कन्स्ट्रक्शन किंवा ब्रेकिंग ग्राउंड स्थितीत असतील तरी त्यांना कर सवलत लागू होणार आहे.

advertisement

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काय म्हटले?

ट्रम्प यांनी आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आम्ही 1ऑक्टोबर 2025 पासून सर्व स्वयंपाकघरातील कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी आणि संबंधित उत्पादनांवर 50% कर लावू. याव्यतिरिक्त, आम्ही अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30% कर लागू करणार." परदेशी देशांकडून अमेरिकन बाजारपेठेत या उत्पादनांचा मोठी आवक आहे. मात्र, हे अतिशय अन्यायकारक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि इतर कारणांसाठी उत्पादन प्रक्रियेचे संरक्षण करण्यासाठी हे निर्णय घ्यायला हवे असेही ट्रम्प यांनी म्हटले.

advertisement

जड ट्रकवर 25 टक्के आयात शुल्क जाहीर करताना ते म्हणाले, "आमच्या प्रमुख जड ट्रक उत्पादकांना अनावश्यक बाह्य स्पर्धेपासून वाचवण्यासाठी, मी सर्व जड (मोठ्या) ट्रकवर 25% कर लावत आहे. आमचे प्रमुख ट्रक उत्पादक, जसे की पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर, मॅक ट्रक्स आणि इतर कंपन्या या बाह्य स्पर्धक कंपन्यांच्या हल्ल्यापासून संरक्षित होतील. आम्हाला आमच्या ट्रक चालकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याची गरज आहे. 

मराठी बातम्या/मनी/
Donald Trump Announce Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा एकदा टॅरीफ स्ट्राईक, औषध कंपन्यांसह कोणत्या भारतीय कंपन्यावर होणार परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल