स्लूटमन यांनी स्नोफ्लेक आणि सर्व्हिसनाऊ आयएनसी या कंपन्यांचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही कंपन्यांची आयपीओ लिस्टिंग झाली होती. त्या पूर्वी त्यांनी डेटा स्टोरेज कंपनी असलेल्या डेटा डोमेनचंही नेतृत्व केलं होतं. ही कंपनी 2009 मध्ये, ईएमसी कॉर्पने अधिग्रहित केली.
नेटवर्थमध्ये 50 कोटी डॉलर्सची घसरण
स्लूटमन यांनी गेल्या महिन्यात 29 फेब्रुवारी रोजी स्नोफ्लेक कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकमध्ये 18 टक्क्यांनी आणि एकूण संपत्तीत 50 कोटी डॉलर्सची (सुमारे 4150 कोटी रुपये) घट झाली होती.
advertisement
सप्टेंबर 2023मध्ये, हाशीकॉर्प आयएनसी या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ डेव्हिड मॅकजेनेट यांनी स्लूटमन यांचं कौतुक केलं होतं. मॅकजेनेट म्हणाले होते की, एखादी कंपनी यशस्वीपणे उभी करणं ही खूप अवघड बाब आहे आणि स्लूटमन यांनी अनेकदा हे काम करून दाखवलं आहे. डॉईश (Deutsche) बँक एजीचे विश्लेषक ब्रॅड झेलनिक यांनी गुरुवारी एका नोटमध्ये लिहिलं की, स्लूटमन यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि गुंतवणूकदार त्यांचा खूप आदर करतात.
भारतीय व्यक्ती घेणार स्लूटमन यांची जागा
गुगलच्या जाहिरात विभागाचे माजी प्रमुख श्रीधर रामास्वामी हे 65 वर्षांच्या स्लूटमन यांची जागा घेणार आहेत. रामास्वामी यांनी 'नीवा' नावाचा स्टार्टअप उभारलेला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये स्नोफ्लेकने 185 दशलक्ष डॉलर्समध्ये हा स्टार्टअप विकत घेतला. तेव्हापासून रामास्वामी स्नोफ्लेकमध्ये आहेत.
दरम्यान, स्लूटमन यांनी कंपनी सोडल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडल्याची चर्चा रंगली होती. ही बाब स्लूटमन यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. कंपनीमध्ये त्यांनी कोणताही गट तयार केला नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.
