लग्नसराईचे दिवस सुरू झाले असताना आता सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. आज, शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी, २४ कॅरेट सोन्याची किंमत ४३९ रुपयांनी घसरून १,२०,२३१ रुपयांवर आली आहे. सोन्याची किंमत आता जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,२३,८३७ रुपये आहे. चांदीचा दर हा सध्या जीएसटीसह प्रति किलो १,५२,४५० रुपये आहे. आज, चांदीचा दर हा जीएसटी शिवाय २३२ रुपयांनी कमी होऊन १,४८,०१० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
advertisement
>> उच्चांकी दरावरून १० हजारांनी स्वस्त...
सोने आता १७ ऑक्टोबरच्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकी दरावरून १०,६४३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या किमती १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकावरून ३०,०९० रुपयांनी कमी झाल्या आहेत.
>> कॅरेटनुसार सोन्याचे दर
आज, २३ कॅरेट सोन्याचे दर ४३७ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,१९,७५० रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत १,२३,३४२ रुपये आहे. मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत.
> २२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर ४०२ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ११०,१३२ रुपये झाले आहेत. जीएसटीसह ती १,१३,४३५ रुपये झाली आहे.
> १८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याचे दर ३३० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ९०,१७३ रुपये झाले आहेत आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,८७८ रुपये झाली आहे.
> १४ कॅरेट सोन्याचे दर
१४ कॅरेट सोन्याचे दर २५७ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ७०,३३५ रुपये झाले आहेत, ज्यामुळे जीएसटीसह किंमत ७२,४४५ रुपये झाली आहे.
(Disclaimer: इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे स्पॉट गोल्ड आणि चांदीच्या किमती जाहीर केल्या जातात. दोन वेळेस दर जाहीर केले जातात.तुमच्या शहरात सोन्याच्या दरात १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो.)
