भारतात नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सोन्याच्या किमतीत किंचित चढ-उताराने झाली. मात्र, दिवाळीपासून सर्व कॅरेटमधील सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे.
किती रुपयांनी स्वस्त सोनं?
धनत्रयोदशीपासून २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७.४% म्हणजेच प्रति १० ग्रॅम ९,७७० रुपयांची घसरण झाली आहे. अमेरिका-चीन आणि अमेरिका-भारत व्यापार करारांवर स्पष्टता आल्यानंतरच सोनं-चांदीच्या किमतींची भविष्यातील दिशा निश्चित केली जाईल. तोपर्यंत, बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १, २३, ००० रुपये, प्रति १०० ग्रॅम १,२३, ००० रुपये, प्रति ८ ग्रॅम ९८,४०० रुपये आणि प्रति ग्रॅम १२,३०० रुपये होती. रविवारी या दरात कोणताही बदल दिसून आला नाही. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत १,१२,७५०, १०० ग्रॅम १,१२,७५००, ८ ग्रॅम ९०,२०० आणि १ ग्रॅम ११,२७५ होती.
भारतातील सोन्याच्या किमतींनी धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी १७ ऑक्टोबर रोजी नवीन उच्चांक गाठला होता.
त्या दिवशी २४ कॅरेट सोन्याने प्रति १० ग्रॅम १,३२,७७० या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. तेव्हापासून, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅममध्ये ९,७७० रुपये अर्थात जवळपास ७.३५ टक्क्यांनी घट झाली आहे.
सोन्याच्या दरात वाढ...
या दरम्यानच्या दिवसात सोन्याच्या किंमतीमध्ये किचिंत वाढ झाली होती. त्यानंतर मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली. आज सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली. आता, लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून सोन्याला पुन्हा एकदा मागणी आली आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. २४ कॅरेट सोन्याचा दर हा जीएसटीसह १ लाख २४ हजार ७४६ रुपये इतका झाला. तर, चांदीचा दर हा जीएसटीसह १ लाख ५४ हजार, ०८८ इतका झाला.
