TRENDING:

Gold Investment News : ‘नाहीतर सगळा पैसा गमवाल...’, सोन्याच्या गुंतवणुकीवर सेबीच्या पत्राने उडाली मोठी खळबळ

Last Updated:

Digital Gold Investment : सुरक्षित आणि भविष्यात चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात.

advertisement
Gold News : सुरक्षित आणि भविष्यात चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. मागील काही वर्षांमध्ये सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेकांकडून सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय म्हणून डिजीटल गोल्डचा पर्याय निवडला जातो. मागील काही वर्षात डिजीटल गोल्डमधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. गुंतवणूक करण्यास सोपं आणि कोणत्याही शुल्कात मोठी कपात होत नसल्याने डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याकडे ओढा वाढला आहे. डिजीटल सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सेबीने धक्का दिला आहे. सेबीच्या एका परिपत्रकाने गुंतवणूकदारांमध्ये धास्ती वाढली आहे.
‘नाहीतर सगळा पैसा गमवाल...’, सोन्याच्या गुंतवणुकीवर सेबीच्या पत्राने उडाली मोठी खळबळ
‘नाहीतर सगळा पैसा गमवाल...’, सोन्याच्या गुंतवणुकीवर सेबीच्या पत्राने उडाली मोठी खळबळ
advertisement

भारतीय बाजार नियामक प्राधिकरण असलेल्या सेबीने डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक मोठा इशारा दिला आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म अशा उत्पादनांची विक्री गुंतवणूकदारांना करत आहेत. या गुंतवणुकी सेबीच्या कोणत्याही चौकटीत येत नसल्याचे सेबीने म्हटले.

या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोणतीही सुरक्षा किंवा गुंतवणूक संरक्षण मिळणार नसल्याचे सेबीने म्हटले.

सोन्यातील गुंतवणूकीत गमवावे लागतील पैसे...

advertisement

सेबीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की काही डिजिटल किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म 'डिजिटल गोल्ड' किंवा 'ई-गोल्ड' उत्पादनांच्या स्वरूपात गुंतवणूक संधी देत ​​आहेत, परंतु ही उत्पादने सिक्युरिटीज किंवा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज नाहीत. म्हणून, सेबीचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. अशा उत्पादनांमुळे गुंतवणूकदारांना प्रतिपक्ष आणि ऑपरेशनल जोखीम येऊ शकतात.

वेगवेगळ्या कंपन्यांकडून डिजीटल गोल्डची विक्री...

सध्या, तनिष्क, एमएमटीसी पीएएमपी, आदित्य बिर्ला कॅपिटल, कॅरेटलेन, जोस अलुक्कास, फोनपे आणि श्रीराम फायनान्स सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्या डिजिटल सोने विकत आहेत. एक सोपा आणि सोयीस्कर गुंतवणूक पर्याय म्हणून त्याचा प्रचार करण्यात येत आहे.

advertisement

गुंतवणूकदारांना कोणतेही संरक्षण नसणार...

सेबीने म्हटले की, कोणतेही ब्रँड कितीही विश्वासार्ह असले तरी, डिफॉल्ट झाल्यास गुंतवणूकदारांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही. या गुंतवणुकीवर सेबीचे नियंत्रण नाही. सेबीने गुंतवणूकदारांना फक्त नियंत्रित सोन्याच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये गोल्ड ईटीएफ, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) आणि एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येईल, असे सेबीने म्हटले आहे.

advertisement

गुंतवणूकदार धास्तावले...

सेबीच्या या इशाऱ्यामुळे डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीच्या वाढत्या ट्रेंडबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही डिजीटल प्लॅटफॉर्म लोकांना कमी रकमेसह गुंतवणूक करण्याची संधी देत ​​आहेत. मात्र, यातून आर्थिक जोखीमही निर्माण करू शकतात, असे सेबीने म्हटले.

मराठी बातम्या/मनी/
Gold Investment News : ‘नाहीतर सगळा पैसा गमवाल...’, सोन्याच्या गुंतवणुकीवर सेबीच्या पत्राने उडाली मोठी खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल