TRENDING:

Gold Silver Price Prediction : १३ हजारांनी घसरलं, १००००० रुपयांच्या खाली येणार सोनं? खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? एक्सपर्टने म्हणतात, आता...

Last Updated:

Gold Silver Price Prediction : सोन्याचा दर पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या खाली येईल का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

advertisement
Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. मागील काही दिवसात सराफा बाजारात सोन्याचा दर हा आपल्या उच्चांकापासून जवळपास १३ हजारांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल का, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. सोन्याचा दर पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या खाली येईल का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
१३ हजारांनी घसरलं, १००००० रुपयांच्या खाली येणार सोनं? खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? एक्सपर्टने म्हणतात, आता...
१३ हजारांनी घसरलं, १००००० रुपयांच्या खाली येणार सोनं? खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? एक्सपर्टने म्हणतात, आता...
advertisement

सोन्याच्या किमतीत जवळपास १३,००० रुपयांची घसरण

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ८७४ होता. मंगळवारी संध्याकाळी तो १, लाख १८ हजार ०४३ रुपयापर्यंत घसरला होता. अवघ्या १३ दिवसांत सोन्याच्या किमतीत जवळपास १३,००० रुपयांनी घसरण झाली आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. भारतात लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत झालेली घसरण खरेदीदारांसाठी दिलासादायक आहे. लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढेल, असे म्हटले जात आहे.

advertisement

तज्ज्ञांचे मत काय आहे?

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी यामध्ये तेजीचे संकेत आहेत. अलिकडच्या एका सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव एका वर्षाच्या आत प्रति औंस ५,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. देशांतर्गत बाजारात तो प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

पेपरस्टोन ग्रुप लिमिटेडचे ​​संशोधन प्रमुख क्रिस वेस्टन म्हणाले की, सोन्याच्या किमती घसरतच आहेत. मात्र, पुढच्या महिन्यात ३९०० डॉलर प्रति औंसचा बचाव करून वायदा बाजारात बुल्सना काही प्रमाणात दिलासा मिळेल. खरेदीदारांकडून वायदा बाजारात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी बदल होऊ शकतो.

advertisement

भारतात आज सोन्याच्या दरात तेजी...

इस्रायलने शस्त्रसंधीचा करार मोडत पॅलेस्टाइनवर पुन्हा एकदा बॉम्ब हल्ले केले आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या बैठकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच कारणामुळे आज भारतीय कमोडिटी एक्सचेंज वरही सोन्या-चांदीच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. एमसीएक्सवर सोने 401 रुपयांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 1,20,047 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरांमध्येही मोठी तेजी दिसत आहे. चांदी ९८९ रुपयांनी म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढून १,४५,३३१ रुपये प्रति किलो दराने ट्रेड करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Prediction : १३ हजारांनी घसरलं, १००००० रुपयांच्या खाली येणार सोनं? खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? एक्सपर्टने म्हणतात, आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल