>> सोन्याच्या दरात घसरण....
२४ कॅरेट सोन्याचे दर आता १७ ऑक्टोबरच्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा १०,७७४ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) आज दुपारी जारी केलेल्या दरानुसार सोन्याच्या दरात किंचीत घट झाली.
>> आजचा सोन्याचा दर काय?
> २३ कॅरेट सोन्याचे आजचे दर: ₹३१८ ने प्रति १० ग्रॅम १,१९,६१९ पर्यंत घसरले. जीएसटीसह, ते प्रति १० ग्रॅम १,२३,२०७ आहे.
advertisement
> २२ कॅरेट सोन्याचे आजचे दर: ₹२९२ ने प्रति १० ग्रॅम १,१०,०१२ पर्यंत घसरले. जीएसटीसह, ते प्रति १० ग्रॅम १,१३,३१२ आहे.
> १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर: ₹२३९ ने प्रति १० ग्रॅम ९०,०७५ पर्यंत घसरले. जीएसटीसह, किंमत ₹९२,७७७ प्रति १० ग्रॅम आहे.
>> 'या' चार कारणांनी सोन्याचा दर घसरला...
सोन्याचा दर घसरणीमागे चार ठळक कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अमेरिकेसह जगभरातील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे.
> अमेरिकेतील डेटाने वाढवला दबाव...
ऑक्टोबरसाठी अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली होती. खाजगी क्षेत्राने २२,००० च्या बाजारातील अपेक्षांच्या तुलनेत ४२,००० नवीन नोकऱ्या जोडल्या. आयएसएम सर्व्हिसेस पीएमआय आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. निर्देशांक ५२.४ पर्यंत वाढला, जो सेवा क्षेत्राच्या ताकदीचे प्रतिबिंब आहे. या मजबूत आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला की अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत आहे, ज्यामुळे व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे.
> फेड अधिकाऱ्यांची भूमिका
फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी आणखी दर कपातीची आवश्यकता नसल्याचे म्हटले. महागाई हळूहळू नियंत्रित केली जात असल्याते त्यांनी म्हटले. सध्या अर्थव्यवस्था स्थिर आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे. त्यामुळेच नॉन-परफेक्टिंग मालमत्तेवर दबाव आणत आहे.
> 'सेफ-हेवन'च्या मागणीत घट
मजबूत अमेरिकन नोकरी डेटा आणि सेवा क्षेत्रामुळे बाजारातील जोखीम घेण्याबाबत सकारात्मकता आहे. यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे सध्या गुंतवणूकदारांचा कल कमी झाला आहे. अलीकडेच ४,१०० डॉलर प्रति औंस पेक्षा जास्त दर गाठल्यानंतर सोन्याने आता ३,९८० डॉलर प्रति औंस या चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. ब्लूमबर्ग डॉलर स्पॉट इंडेक्स जवळजवळ स्थिर आहे, ज्यामुळे सोन्याची पुढील घसरण रोखली जात आहे, परंतु उलट होण्याची चिन्हे देखील दिसत नाहीत.
> शटडाऊनमुळे वाढली अनिश्चितता
अमेरिकेत सुरू असलेल्या ३७ दिवसांच्या सरकारी शटडाऊनमुळे, कामगार बाजारातील महत्त्वाचे डेटा अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे गुंतवणूकदारांना फेडच्या पुढील हालचालीचा अंदाज घेण्यासाठी संपूर्ण डेटा उपलब्ध नाही. बाजार सध्या "वेट अँड वॉच" या स्थितीत आहे आणि सोने प्रत्येक सिग्नलला संवेदनशीलपणे प्रतिसाद देत आहे.
>> सोने आणखी घसरेल का?
आर्थिक विश्लेषकांनी म्हटले की, जोपर्यंत डॉलर मजबूत राहिल आणि फेडरल रिझर्व्हची भूमिका कायम राहिल, तोपर्यंत सोन्याचा दर हा ३,९५० डॉलर ते ३,९८० डॉलर या दरम्यानच्या दबावाखाली राहील. जर यूएस डेटा कमकुवत असेल किंवा डिसेंबरमध्ये पुन्हा दर कपात होण्याची शक्यता असेल, तर सोने ४,०५० डॉलर ते ४,१०० डॉलर प्रति औंसपर्यंत परत येऊ शकते.
