TRENDING:

Gold Silver Price : भाऊबीजेच्या दिनी उलटफेर, चांदीच्या दरात 7000 रुपयांनी घट, सोन महागलं! आजचा दर काय?

Last Updated:

Gold Silver Price : बुधवारी पाडव्याच्या दिनी सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली. मात्र, आज सोन्याला आज दरवाढीची झळाळी मिळाली.

advertisement
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव: दिवाळी सणाचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. बुधवारी पाडव्याच्या दिनी सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली. मात्र, आज सोन्याला आज दरवाढीची झळाळी मिळाली. तर, दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी कपात झाली.
भाऊबीजेच्या दिनी उलटफेर, चांदीच्या दरात 7000 रुपयांनी घट, सोन महागलं! आजचा दर काय?
भाऊबीजेच्या दिनी उलटफेर, चांदीच्या दरात 7000 रुपयांनी घट, सोन महागलं! आजचा दर काय?
advertisement

 सोनं-चांदीचा दर काय?

भाऊबीजच्या शुभ दिवशी सुवर्णगिरीत सोन्याने विक्रम मोडला असून चांदीला मोठा फटका बसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले आहे. सोन्याचा दर तब्बल १००० रुपयाने वधारून प्रति तोळा १,२७,००० रुपये इतका झाला आहे, तर चांदीचा दर उलट ७,००० रुपयांनी घसरला असून १,६२,७४० प्रति किलो इतका झाला आहे.

सुवर्णगिरीत ग्राहकांची गर्दी, सोन्याला वाढती मागणी

advertisement

दीपावली आणि भाऊबीज सणामुळे जळगावच्या सुवर्णगिरी परिसरात मोठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. दरात चढ-उतार असूनही लोक सोनं खरेदी करण्यास उत्सुक असून, दागिने, नाणी आणि गुंतवणुकीसाठी गोल्ड बारची मागणी वाढताना दिसत आहे.

सोनं का महागलं?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्यामुळे सोन्याचे मूल्य वाढत आहे.

advertisement

जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार ‘सेफ हेवन’ (Safe Asset) म्हणून सोन्याकडे वळत आहेत.

चांदीचा दर खाली का आला?

चांदीच्या भावातील घसरणीमागे औद्योगिक मागणीत आलेली घट कारणीभूत असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तरीही सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने चांदीच्या नाण्यांना सध्या चांगली मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरात वाढ-घसरण होत असली तरी लोकांचा उत्साह कमी झाला नसल्याचे सराफा व्यावसायिकांनी म्हटले. अनेक ग्राहक शुभमुहूर्त साधून खरेदी करत आहेत. सुवर्णगिरीत भाऊबीज सणामुळे अक्षरशः ‘सोन्याचं वातावरण’ तयार झालं आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक सराफा व्यावसायिकांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price : भाऊबीजेच्या दिनी उलटफेर, चांदीच्या दरात 7000 रुपयांनी घट, सोन महागलं! आजचा दर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल