मुंबई: एनालिस्ट्सचा अंदाज आहे की पुढील आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात स्थैर्य (consolidation) दिसू शकते. कारण गुंतवणूकदार सध्या विविध प्रमुख केंद्रीय बँकांच्या बैठकींवर आणि जागतिक व्यापाराशी संबंधित घटनांवर लक्ष ठेवून आहेत. पीटीआयच्या अहवालानुसार विश्लेषक म्हणतात की- गुंतवणूकदारांचे लक्ष विशेषतः अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed) च्या बैठकीकडे आणि चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्यांकडे असेल. कारण त्यातून आगामी व्याजदरांबाबतचे संकेत मिळू शकतात.
advertisement
याशिवाय दक्षिण कोरियात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची होणारी भेट तसेच गुरुवारी होणारी युरोपियन सेंट्रल बँकेची (ECB) पुनरावलोकन बैठकही सोन्याच्या किंमतींच्या दिशेवर परिणाम करू शकते.
सलग 10 आठवड्यांच्या वाढीनंतर घसरण
JM फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांनी सांगितले की- सलग दहा आठवड्यांच्या सातत्यपूर्ण वाढीनंतर अखेर सोन्याच्या किंमतीत पहिल्यांदाच घट दिसली आहे. त्यांच्या मते ही घसरण मुख्यतः Profit booking भारत आणि चीनसारख्या आशियाई बाजारांतील कमजोर भौतिक मागणी, तसेच मजबूत अमेरिकन डॉलर यांमुळे झाली आहे.
आठवड्याच्या उत्तरार्धात भारतातील सोन्याची खरेदी मंदावली, कारण ग्राहकांना आणखी किंमत घसरण्याची अपेक्षा होती. तथापि, चीन आणि सिंगापूरमध्ये किंमती कमी झाल्यानंतर काही प्रमाणात खरेदी परतताना दिसली.
MCX वर 2.8% घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोन्याच्या किंमतीत आठवडाभरात 3,557 किंवा 2.8% इतकी घसरण झाली. एंजेल वनचे DVP-नॉन-अॅग्री कमोडिटीज आणि करंसी रिसर्च प्रमुख, प्रथमेश मल्या यांनी सांगितले की- ही घसरण गुंतवणूकदारांच्या मुनाफावसूलीमुळे झाली आहे. कारण सोने अलीकडेच रेकॉर्ड उच्चांकावर पोहोचले होते.
याशिवाय अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारण्याच्या चिन्हांमुळे आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चेत सकारात्मक निकालांची अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांचा धोका घेण्याचा कल (risk appetite) वाढला. ज्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी ओळखले जाणारे सोने थोडेसे दुर्लक्षित झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात Comex वर घसरण
आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमेक्स (Comex) बाजारातही सोने आठवडाभरात USD 75.5 किंवा 1.8% ने घसरले. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने USD 4,398 प्रति औंस असा सर्वकालीन उच्चांक (all-time high) गाठला होता. परंतु मंगळवारी एकाच दिवशी USD 266.4 म्हणजेच 6.11% इतकी घसरण झाली — जी मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण ठरली.
चांदीचीही मोठी पडझड
सोन्याबरोबरच चांदी (Silver) नेही अलीकडील विक्रमी वाढीनंतर मोठी घसरण अनुभवली. MCX वर डिसेंबर वायदा चांदी 9,134 किंवा 5.83% ने कोसळली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात ती 3.02% घसरली.
17 ऑक्टोबर रोजी चांदीने USD 53.76 प्रति औंस असा विक्रमी उच्चांक गाठला होता. परंतु 21 ऑक्टोबरपर्यंत ती 8% पेक्षा जास्त घसरून USD 47.12 प्रति औंस वर आली ही 2021 नंतरची सर्वात मोठी घसरण होती.
पुढे काय?
एनालिस्ट्सचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत विविध जागतिक धोरणात्मक निर्णयांमुळे बुलियन मार्केट (Bullion Market) अस्थिर राहू शकते. मात्र जोपर्यंत पुढील मोठी आर्थिक किंवा मौद्रिक घोषणा होत नाही. तोपर्यंत बाजारात एकूणच कंसोलिडेशनचा कल (range-bound movement) कायम राहील.
