सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की 2026 पर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं का? या प्रश्नावर वर्ल्ड गोल्ड काउंसिलचे CEO डेविड टेट यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. 'सध्या सोनं वाढतंय ते कोणत्या एका युद्धामुळे किंवा तात्पुरत्या घटनेमुळे नाही, तर खोल आणि दीर्घकालीन आर्थिक कारणांमुळे आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात." असं मत डेव्हिड टेट यांनी व्यक्त केलं.
advertisement
तसंच, 'जगभरात वाढणारा सरकारी कर्ज हा सोन्याच्या वाढीमागचं सर्वात मोठं कारण आहे. टॅरिफ, व्यापारातील वाद किंवा काही काळची आर्थिक अस्थिरता हे फक्त साइड शो आहेत. खरी समस्या म्हणजे अनेक देश गरजेपेक्षा जास्त खर्च करत आहेत आणि ते नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत आहेत. जेव्हा आर्थिक स्थिरता कमी होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात' असं टेट यांचं म्हणणं आहे
2026 पर्यंत सोन्यात वाढ होण्याची 6 मोठी कारणं
चीनमध्ये डिरेग्युलेशनमुळे वाढणारी मागणी, जागतिक चलनांची कमजोरी, सततचे भू-राजकीय तणाव, व्यापार आणि टॅरिफचा दबाव, वाढता न्यूक्लियर धोका आणि बिघडती आर्थिक आणि राजकोषीय स्थिती यांचा समावेश आहे. हे सगळे घटक मिळून सोन्याच्या किमतींना दीर्घकाळ आधार देतील आणि त्यात स्थिरता येण्याची शक्यता कमी आहे.
1,92,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत
2026 पर्यंत सोनं हे 6,000 डॉलर प्रति औंस म्हणजेच सुमारे 1,92,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं. भारतीय बाजारात कर आणि इतर शुल्क जोडल्यावर हा आकडा 2 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केलं की, जागतिक कर्जात ठोस घट झाली नाही, तोपर्यंत सोन्याची वाढ थांबण्याची शक्यता फारच कमी आहे.
जगभरातील सेंट्रल बँका पुढच्या काळात आपलं गोल्ड रिझर्व्ह वाढवू शकतात. तसंच सामान्य आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची मागणीही हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं एक विश्वासार्ह पर्याय राहिलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ 2026 पर्यंत सोन्याबद्दल खूप सकारात्मक आहेत. सोन्याबद्दल दिलेला हा संकेत गुंतवणूकदारांसाठी पुढील वर्षांची रणनीती ठरवायला उपयुक्त ठरू शकतो.
Disclaimer: (इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
