TRENDING:

सोन्या चांदीनं वाढवलं टेन्शन! जगभरात वाढली भीती, कोट्यवधींचं नुकसान असं काय घडलं?

Last Updated:

MCX वर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं १,५७,३०० रुपये आणि चांदी २,५७,८९१ रुपये. अमेरिकन डॉलर वाढल्याने मागणी कमी, बाजारात अस्थिरता कायम.

advertisement
मागच्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या दरांनी धुरळा उडवला होता. ज्या काही वेगानं चांदीचे दर खाली कोसळले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. तर ऐन लग्नसराईत भाव कमी झाल्याने खरेदीदारांची चांदी झाली आहे. सोन्या-चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सलग दोन दिवस वधारल्यानंतर, आज १० फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोन्याचे दर ०.४८ टक्क्यांनी तर चांदी तब्बल १.८० टक्क्यांनी घसरली आहे.
News18
News18
advertisement

गुंतवणूकदार आणि खरेदीदारांची नजर असलेल्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,५७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर चांदीमध्ये मोठी पडझड होऊन ती २,५७,८९१ रुपये प्रति किलो वर व्यवहार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याने ५,५९४ डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर आता दरात काही प्रमाणात 'करेक्शन' म्हणजेच घट दिसून येत आहे.

का कोसळले भाव?

advertisement

अमेरिकन डॉलरच्या मूल्यात ०.२ टक्क्यांची वाढ झाल्याने परदेशी खरेदीदारांसाठी सोने महाग झाले आणि मागणी घटली. बुधवारी अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि शुक्रवारी महागाईचा डेटा येणार आहे. या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदारांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह जून महिन्यापर्यंत व्याजदरात कपात करू शकते, अशी चर्चा बाजारात आहे. या संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या सावध पावले टाकत आहेत.

advertisement

खरेदीदारांसाठी संधी की सावधानता?

लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी ही घसरण एक छोटीशी संधी ठरू शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे. चांदीमध्ये काल ७ टक्क्यांची मोठी तेजी होती, मात्र आज ती पुन्हा २.५ टक्क्यांनी खाली आली आहे.

त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकीकडे सुळे कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू असताना आणि दुसरीकडे बाजारातील हे चढ-उतार सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर ५,०१६ डॉलर प्रति औंसवर आल्याने येणारे दोन-तीन दिवस भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत कळीचे ठरणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
सोन्या चांदीनं वाढवलं टेन्शन! जगभरात वाढली भीती, कोट्यवधींचं नुकसान असं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल