केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. २ फेब्रुवारीच्या सकाळी सोन्याचे दर १ लाख ६० हजारांच्या आसपास स्थिरावले आहेत, तर चांदीच्या दरात अवघ्या दोन-तीन दिवसांत तब्बल १ लाख रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील मंदी, डॉलरचा वाढलेला जोर आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा वसुली (Profit Booking) ही यामागची प्रमुख कारणे आहेत. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६०,७२० रुपये असून २२ कॅरेटसाठी १,४७,३४० रुपये मोजावे लागत आहेत.
advertisement
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे दर | 24 कॅरेट सोन्याचे दर |
| दिल्ली | 147340 | 160720 |
| मुंबई | 147190 | 160570 |
| अहमदाबाद | 147240 | 160620 |
| चेन्नई | 147190 | 160570 |
| कोलकाता | 147190 | 160570 |
| हैदराबाद | 147190 | 160570 |
| जयपूर | 147340 | 160720 |
| भोपाळ | 147240 | 160620 |
| लखनऊ | 147340 | 160720 |
| चंडीगढ | 147340 | 160720 |
मागच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 2 लाख रुपयांनी चांदीचे दर घसरले होते. मात्र पुन्हा हळूहळू रिकव्हरी होताना दिसत आहे. आता चांदीचे दर 1 लाख रुपयांनी घसरले आहेत. चांदीचे दर 4 लाख 20 हजारपर्यंत जाऊन आले होते. तर सोनंही 1 लाख 85 हजार रुपायांच्या आसपास गेलं होतं. मात्र हा फुगवटा फुटला आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू या शहरांमध्ये २४ कॅरेट सोने १,६०,५७० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,४७,१९० रुपयांवर आले आहे.
| इंडियन बुलियन असोसिएशनच्या नुसार | सोन्याचे दर | |
| मुंबई | सोन्याचे दर | चांदीचे दर |
| 24 कॅरेट | 151804 | 275419 |
| 22 कॅरेट | 139140 | - |
| 18 कॅरेट | 113777 | - |
| 14 कॅरेट | 88376 | - |
३० जानेवारीला हाच भाव ४ लाख रुपयांच्या पुढे गेला होता. म्हणजेच अवघ्या ४८ तासांत चांदी ५०,००० रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव ५,०८७ डॉलर प्रति औंस आणि चांदी ९५.२६ डॉलरवर आल्याने भारतीय बाजारात पडसाद उमटले. अमेरिकन डॉलर वधारल्याने सोने-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. अर्थमंत्र्यांनी 'सोव्हरिन गोल्ड बाँड' (SGB) वरील कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलत दिल्याने फिजिकल सोन्यावरील दबाव वाढला आहे.
