राह वीर योजनेअंतर्गत, एखाद्या रस्त्यावरून जाणारा किंवा नागरिक अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवतो, तर त्यांना ₹25,000 रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र मिळते. मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019 च्या कलम 134A अंतर्गत लागू केलेली ही योजना मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देखील प्रदान करते, म्हणजेच त्यांना पोलिस किंवा प्रशासनाकडून त्रास दिला जाणार नाही.
advertisement
Post Office च्या स्किमने उभारा ₹25 लाखांचा फंड! हे आहे पूर्ण कॅलक्युलेशन
बक्षीस कोणाला मिळेल?
मदत करणारा हा पीडितेचा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य नसावा. एकापेक्षा जास्त व्यक्ती मदत करत असतील तर रक्कम समान प्रमाणात विभागली जाईल. एका व्यक्तीला वर्षातून पाच वेळा बक्षीस मिळू शकते. ₹25,000ची रोख रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. मदतनीसाने जखमी व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवावी. मदतनीसाने प्रथम पोलिसांना किंवा हायवे हेल्पलाइनला अपघाताची माहिती द्यावी आणि पीडितेला ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे.
Credit Card पहिल्यांदाच घेतलंय का? करु नका या चुका, Cibil Score होईल खराब
जखमी रुग्णालयात पोहोचल्यानंतर, रुग्णालय पोलिसांना सूचित करते आणि इलेक्ट्रॉनिक तपशीलवार अॅक्सीडेंट रिपोर्ट तयार करते. प्रत्येक जिल्ह्यात, रहवीरांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाते. रहवीरकडून माहिती मिळाल्यानंतर, पोलिस रुग्णालयाकडून माहिती गोळा करतात. अहवाल तयार करतात आणि समितीकडे पाठवतात. एखाद्या व्यक्तीने पोलिसांना न कळवता जखमींना रुग्णालयात आणले तर रुग्णालयाने पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे.
