TRENDING:

1 वर्ष काम केलं तर ग्रॅच्युटी मिळणार का, कशी मोजली जाते? काय आहे नियम

Last Updated:

केंद्राचा नवीन लेबर कोड २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू, फिक्स्ड टर्म व कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ वर्षानंतर ग्रॅच्युइटी हक्क, इतरांसाठी ५ वर्षांची अट कायम

advertisement
केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षात नवीन लेबर कोड लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता एक वर्ष नोकरी केली तरीसुद्धा ग्रॅच्युटी द्यावी लागणार आहे. यापूर्वी पाच वर्षांची अट होती मात्र ती शिथिल करण्यात आली आहे. या नव्या नियमामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी मोजण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल झाला आहे. कामगार मंत्रालयाने हे नवीन नियम २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू केले आहेत.
पगार
पगार
advertisement

1 वर्षाची सेवा केल्यास काय अट

नवीन नियमांनुसार,फिक्स्ड टर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता केवळ १ वर्षाची सेवा पूर्ण केल्यावरही ग्रॅच्युइटी मिळवण्याचा अधिकार असेल. कंत्राटी कामगारांसाठी १ वर्षाचा करार पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युइटीसाठी पात्र होतील. इतर कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षांची अट कायम आहे.

Success Story : नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video

advertisement

या लोकांना वगळण्यात येईल

मात्र, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ही अट लागू राहत नाही. ग्रॅच्युइटी मोजताना आता वेतन या शब्दाची व्याप्ती बदलली आहे. नवीन कायद्यानुसार, तुमचा मूळ पगार, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स यांचा समावेश पगारातच केला जाईल. बोनस, एचआरए, पीएफमधील योगदान आणि प्रवास भत्ता हे घटक ग्रॅच्युइटीच्या मोजणीतून वगळण्यात आले आहेत.

advertisement

ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?

तुमच्या शेवटच्या महिन्याचा पगार आणि एकूण सेवा काळ यावर ग्रॅच्युइटी अवलंबून असते.

ग्रॅच्युइटी = (शेवटचा महिना पगार) × (१५/२६) × (पूर्ण झालेली सेवा वर्षे)

उदा: जर तुमचा पगार ५०,००० रुपये असेल आणि तुम्ही १० वर्षे काम केले असेल, तर १५/२६ च्या हिशोबाने तुमची ग्रॅच्युइटी मोजली जाईल. कंत्राटी कामगारांच्या बाबतीत, त्यांनी जेवढा काळ काम केला आहे, त्या प्रमाणात त्यांना ही रक्कम मिळेल.

advertisement

Gold Silver Price: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे दर

कधी मिळणार पैसे?

सेवा संपल्यापासून ३० दिवसांच्या आत कंपनीला ग्रॅच्युइटीचे पैसे द्यावे लागतील. जर तुमचा करार फक्त ११ महिन्यांचा असेल, तर तुम्ही नवीन नियमानुसार ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरणार नाही. किमान १२ महिने सेवा आवश्यक आहे. हे सर्व बदल २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाले आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
1 वर्ष काम केलं तर ग्रॅच्युटी मिळणार का, कशी मोजली जाते? काय आहे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल