TRENDING:

उशीर केला तर पश्चाताप ठरलेला, Share Market मध्ये शेवटची संधी; हा शेअर हातातून गेला, तर परत मिळणार नाही

Last Updated:

Stock Recommendation : एचडीएफसी बँकेने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल सादर केल्याने गुंतवणूकदारांचा आणि आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊसचा विश्वास वाढला आहे. जेफरीज, CLSA, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्ससारख्या दिग्गज संस्थांनी या शेअरबाबत बुलिश दृष्टिकोन व्यक्त करत टारगेट किंमती वाढवल्या आहेत.

advertisement
नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेचे जून तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीचा शेअर CLSA, गोल्डमन सॅक्स, जेफ्रीज आणि नोमुरा यासारख्या विदेशी ब्रोकरेज हाउसेसचा आवडता शेअर बनला आहे. बँकेच्या तिमाही कामगिरीने खूश झालेल्या ब्रोकरेज हाउसेसनी एचडीएफसी बँकेवर ‘बुलिश’ भूमिका घेतली आहे.
News18
News18
advertisement

बँकेने अपेक्षेप्रमाणे ऑपरेशनल कामगिरी केली असून टॅक्स रिव्हर्सलमुळे प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट (PPOP) आणि नफा अपेक्षेपेक्षा चांगला नोंदवण्यात आला आहे. यामुळेच ब्रोकरेज हाउसेसनी गुंतवणूकदारांना एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसा लावण्याचा सल्ला दिला आहे.

8वा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांचा किमान पगार किती होईल? आकडे ऐकून विश्वास बसणार नाही

सोमवारी 21 जुलै रोजी एचडीएफसी बँकेचा शेअर सुमारे 2 टक्क्यांनी उसळी घेत 1,994 या भावावर व्यवहार करत होता. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 2 हजारच्या पुढे गेला होता. गेल्या एका महिन्यात हा शेअर 2.34 टक्क्यांनी वाढला आहे. तर वर्ष 2025 मध्ये याने गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा दिला आहे. मागील एक वर्षात या शेअरच्या किमतीत 21.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

advertisement

UPI नाही, फक्त रोख पैसे; या पोस्टरचे खळबळजनक गणित, बाजारात चालतोय गुप्त QR कोड

का आहेत बुलिश?

जेफ्रीजने एचडीएफसी बँकेचा नफा अपेक्षेपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बँकेची लोन ग्रोथ चांगली राहिली आहे. डिपॉझिट ग्रोथ मजबूत राहिली आहे, नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) मध्ये अपेक्षेपेक्षा कमी घट झाली आहे आणि अॅसेट क्वालिटी स्थिर राहिली आहे.

advertisement

ब्रोकरेजने अंदाज व्यक्त केला की टॅक्स कपात, व्याजदर कपात, नियम सुलभ होणं आणि सणासुदीचा हंगाम हे घटक दुसऱ्या सहामाहीत बँकिंग क्षेत्र आणि एचडीएफसी बँकेच्या वाढीस चालना देतील.

टार्गेट प्राइस काय?

जेफ्रीजने बँकेच्या शेअरचे लक्षांक वाढवून 2,400 केला आहे. तसेच अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स (ADR) चे मूल्य 92 डॉलर्स निश्चित केले आहे. सोमवारी बँकेचा शेअर 1,991.90 वर 1.76% वर बंद झाला.

advertisement

गोल्डमन सॅक्सने म्हटलं आहे की बँकेची कामगिरी त्यांच्या अंदाजाप्रमाणेच राहिली आहे. आता बँक लोन ग्रोथ च्या आपल्याच दिशानिर्देशांनुसार वाटचाल करत आहे. दुसऱ्या सहामाहीत चांगले NIM आणि ऑपरेटिंग लीवरेज यामुळे नफ्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

गोल्डमन सॅक्सने FY25 मध्ये 12% आणि FY27 मध्ये 20% ऑपरेटिंग प्रॉफिट ग्रोथचा अंदाज वर्तवला आहे. या ब्रोकरेजनं बँकेसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देत टार्गेट 2,327 ठरवलं आहे.

advertisement

CLSA ची भूमिका

CLSA ने म्हटलं आहे की बँकेचा नेट इंटरेस्ट इनकम (NII) आणि PPOP हे अनुक्रमे 2% आणि 10% त्यांच्या अंदाजापेक्षा चांगले नोंदले गेले. डिपॉझिट ग्रोथ आणि NIM प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरले.

CLSA च्या मते, मोठ्या बँकांमध्ये 15 बेसिस पॉइंट्स (bps) NIM घट होण्याची अपेक्षा होती. मात्र एचडीएफसी बँकेने फक्त 11bps घट नोंदवली, जी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांनी आपला टारगेट 2,200 वरून वाढवून 2,300 केला असून O-PF (Outperform) रेटिंग कायम ठेवली आहे.

नोमुरा काय म्हणतं?

नोमुरा ने म्हटलं आहे की ते एचडीएफसी बँकेला जून 2027 च्या Book Value per Share (BVPS) च्या 2.3 पट मुल्यात मोजत आहेत. त्यांचा नवीन टार्गेट 2,190 आहे. जो आधी 2,140 होता.

ब्रोकरेजनं बँकेच्या सब्सिडियरी व्हॅल्यू 240 प्रति शेअर इतकी ठरवली आहे.

(Disclaimer: येथे दिलेल्या शेअर्सविषयीची माहिती ब्रोकरेज हाउसेसच्या सल्ल्यावर आधारित आहे. या पैकी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास त्यासाठी News18 जबाबदार राहणार नाही.)

मराठी बातम्या/मनी/
उशीर केला तर पश्चाताप ठरलेला, Share Market मध्ये शेवटची संधी; हा शेअर हातातून गेला, तर परत मिळणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल