बँकेचा फक्त नफा वाढला नाही. तर शेअरहोल्डर्सनाही मोठा दिलासा देत बँकेने 5 प्रति शेअर स्पेशल डिव्हिडेंड आणि 1:1 बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर 1 शेअर असेल, तर आता तुम्हाला त्याबरोबर एक बोनस शेअर मोफत मिळेल.
आर्थिक कामगिरीचा तपशील :
-बँकेची एकूण उत्पन्न (Total Income) या तिमाहीत वाढून 99,200 कोटी झाले. जे मागील आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-जून 2024) 83,701 कोटींपेक्षा लक्षणीय जास्त आहे.
advertisement
-याच दरम्यान बँकेचा एकूण खर्च 63,467 कोटी होता. तर मागील वर्षी हा खर्च 59,817 कोटी होता.
-नेट इंटरेस्ट इनकम (NII) 31,438 कोटी झाली असून ही 5.4% ची वाढ दर्शवते.
-ऑपरेटिंग प्रॉफिट 35,734 कोटी इतका नोंदवण्यात आला असून खर्चातही 4.9% वाढ झाली आहे.
-बँकेची एकूण जमा रक्कम 27.64 लाख कोटी झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 16.2% जास्त आहे.
-बँकेचे Loan Book आता 26.53 लाख कोटी वर पोहोचले आहे.
बोनस व डिव्हिडेंड कधी मिळणार?
बोनस शेअर व डिव्हिडेंड मिळवण्यासाठी 25 जुलैपर्यंत गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असणे आवश्यक आहे.
-बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट 27 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे.
-डिव्हिडेंडचे पेमेंट 11 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल.
HDB फायनान्शियल IPO मुळे प्रचंड कमाई :
HDFC बँकेच्या HDB फिनान्शियल सर्व्हिसेस या सब्सिडियरीच्या IPO मुळे बँकेला 9,128 कोटींचा प्री-टॅक्स फायदा झाला आहे. यामुळे बँकेच्या इतर उत्पन्नात जबरदस्त वाढ झाली आहे.
दरम्यान या निकालांच्या आधी शुक्रवारी HDFC बँकेचे शेअर्स NSE वर 1.56% घसरून 1,959 वर बंद झाले होते.
