एचडीएफसी म्युच्युअल फंड, भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या म्युच्युअल फंडपैकी एक, या फंडने गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स दिले आहेत. एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंडने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
किती वर्ष करायची गुंतवणूक?
तुम्हाला दर महिन्याला 2000 रुपये गुंतवायचे आहेत. 30 वर्ष तुम्ही ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 2 कोटींहून अधिक पैसे मिळणार आहेत. केवळ SIP द्वारेच नव्हे तर एकरकमी गुंतवणुकीवर देखील चांगला परतावा देण्यात तो यशस्वी झाला आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशात 76 टक्के रिटर्न मिळवले आहेत. या गुंतवणुकीमुळे तुम्हाला चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय तुमच्या पैशाला कालांतराने योग्य दिशेने वाढण्याची संधीही मिळते.
advertisement
सुरक्षेसोबत उत्तम रिटर्न्सही
HDFC कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड योजना आहे, जी 1994 मध्ये सुरू झाली. ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी आहे जे त्यांचे पैसे वाढवण्यासाठी स्थिर आणि लाँग टर्मसाठी एक उत्तम पर्याय आहे. या गुंतवणुकीद्वारे अंडरव्हॅल्यू स्टॉकचा फायदा घेऊ शकतील आणि या शेअर्सचं मूल्य कमी असेल मात्र रिटर्न्स जास्त मिळतील असं आहे. ही योजना मल्टीकॅप फंडाप्रमाणे काम करते, म्हणजेच ती लहान, मध्यम आणि मोठ्या बाजार भांडवल कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करते. त्याचा फायदा असा आहे की गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळी गुंतवणूक करून लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे जोखीम कमी होते आणि दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होते.
मागचा पाच वर्षात किती दिले रिटर्न्स
एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंडाने गेल्या काही वर्षांत जोरदार परतावा दिला आहे, जो गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरला आहे. या फंडाने गुंतवणूकदारांना 1 वर्षात 48% CAGR (कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) परतावा दिला आहे, ही उत्कृष्ट कामगिरी आहे.
याशिवाय, या फंडाचा परतावा 3 वर्षात 21.12% CAGR आणि 5 वर्षात 22.55% CAGR आहे. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या फंडाने 10 वर्षांत 15.53% चा CAGR परतावा दिला आहे, जो स्थिर आणि चांगली वाढ दर्शवितो.