TRENDING:

Gold Baggage Rules 2026: गोल्ड ज्वेलरीवर मोठा दिलासा! पाहा नवीन कस्टम नियम काय

Last Updated:

परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन बॅगेज रुल्स 2026 नुसार, आता भारतीय नागरिक, भारतीय मुळचे लोक आणि वैध व्हिसा असणारे पदरेशी नागरिक (टूरिस्ट व्हिसा वगळता)75,000 रुपयांपर्यंतचे सामाहित्य ड्यूटी फ्री आणू शकता.

advertisement
नवी दिल्ली : परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. सरकारने नवीन बॅगेज रुल्स 2026 लागू केले आहेत. जे 2 फेब्रववारी 2026 पासून लागू होतील. या नियमांनी ड्यूटी फ्री साहित्य आणण्याची लिमिट वाढली आहे. पहिले ही लिमिट 50 हजार रुपये होती. मात्र आता भारतीय नागरिक, भारतीय वंशाचे लोक आणि वैध व्हिसा असलेले परदेशी नागरिक (पर्यटक व्हिसा वगळता) 75,000 रुपयांपर्यंत किमतीचे सामान सीमाशुल्काशिवाय आणू शकतात.
बॅगेज रुल्स
बॅगेज रुल्स
advertisement

या वस्तू प्रवाशासोबत किंवा त्यांच्या सामानात असायला हव्या. विदेशी टूरिस्टचे वेगवेगळे नियम आहेत; ते विमान किंवा समुद्रमार्गे येताना 25,000 रुपयांपर्यंतच्या वस्तू शुल्कमुक्त आणू शकतात, जर त्यांच्यासोबत वस्तू असतील तर. हे नियम जमिनीवरून नव्हे तर हवाई किंवा समुद्रमार्गे येणाऱ्यांना लागू होतात. या नवीन नियमांनी जुन्या नियमांची जागा घेतली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

advertisement

Gold Rateमध्ये होऊ शकतो मोठा उलटफेर! ट्रम्पने टॅरिफ घटवल्यानंतर सोन्याच्या किंमती बदलणार?

पर्सनल यूजसाठीच्या ज्वेलरीवर लागणार नाही ड्यूटी 

विशेषतः सोन्याच्या ज्वेलरीसाठी नियम बदलले आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, आता किंमतीवर आधारीत नाही, तर वजनाच्या आधारावर ड्यूटी फ्री सूट मिळेल. भारतीय किंवा भारतीय वंशाचे प्रवासी जे एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात आहेत आणि भारतात परतत आहेत ते वैयक्तिक वापरासाठी दागिने शुल्कमुक्त आणू शकतात. महिला प्रवाशांना 40 ग्रॅम पर्यंत दागिने शुल्कमुक्त आणण्याची परवानगी आहे.

advertisement

ज्वेलरीवर ड्यूटीची चिंता होणरा कमी 

पुरुष किंवा इतर प्रवाशांसाठी ही लिमिट 20 ग्राम आहे. ही ज्वेलरी सोने, चांदी, प्लॅटिनम किंवा अशा मौल्यवान मेटलची असू शकते. मग स्टोन लागलेले असो किंवा नाही. मात्र हे फक्त पर्सनल यूजसाठी आहे. विकण्यासाठी नाही. लिमिटला शेअर केले जाऊ शकत नाही. म्हणजेच एका प्रवाशाची सूट दुसऱ्यासोबतच जोडली जाऊ शकत नाही. ज्वेलरी बॅगेचचा भाग असायला हवी.

advertisement

Gold Sale: येथे सोनं विकण्यासाठी रांगेत उभे आहेत लोक! सोन्याचे भाव कोसळणार?

हे बदल अनिवासी भारतीयांसाठी आणि परदेशातून खरेदी करून परतणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. लहान भेटवस्तू, पर्सनल वस्तू किंवा दागिन्यांवर आता शुल्काची चिंता कमी झाली आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रवासी नवीन लॅपटॉप किंवा नोटपॅड देखील शुल्कमुक्त आणू शकतात. तथापि, मोठ्या प्रमाणात अल्कोहोल, सिगारेट किंवा व्यावसायिक वस्तू यासारख्या काही वस्तूंसाठी नियम वेगळे आहेत. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह म्हणाले की, सामानाचे नियम शिथिल केले गेले आहेत आणि अलिकडेच 18% पर्यंत शुल्क कमी केले गेले आहे, यामुळे भारतीय रत्ने आणि दागिने क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Baggage Rules 2026: गोल्ड ज्वेलरीवर मोठा दिलासा! पाहा नवीन कस्टम नियम काय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल