बीएसईवर अलॉटमेंट तपासायची पद्धत
सर्वांत आधी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर क्लिक करावं.
यानंतर 'इक्विटी'वर क्लिक करा.
नंतर 'इश्यू नेम'मध्ये बजाज हाउसिंग फायनान्स निवडा.
नंतर पॅन नंबर किंवा अॅप्लिकेशन नंबर टाका.
नंतर आय अॅम नॉट रोबोट निवडा.
ही प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस दिसेल.
KFin टेकच्या लिंकवर अलॉटमेंट तपासायची पद्धत
https://ris.kfintech.com/ipostatus/ या लिंकवर जा.
advertisement
नंतर बजाज हाउसिंग फायनान्स हा पर्याय निवडा.
त्या ठिकाणी पॅन नंबर, अॅप्लिकेशन नंबर किंवा डीमॅट अकाउंट नंबर टाकावा.
त्यानंतर लगेच तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस पाहायला मिळेल.
आयपीओ कधी लिस्ट होणार? आजचा जीएमपी आणि प्राइस बँड
सोमवारी, 16 सप्टेंबरला बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतो. ग्रे मार्केट म्हणजे अनौपचारिक स्टॉक मार्केट ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओचा आजचा जीएमपी 75.50 रुपये आहे. बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओसाठी कंपनीने 66 ते 70 रुपयांचा प्राइस बँड ठरवला आहे. तसंच 214 शेअर्सचा लॉट ठरवण्यात आला आहे.
आयपीओची संभाव्य लिस्टिंग प्राइस
या आयपीओचा लेटेस्ट जीएमपी 75.50 रुपये आहे. त्यानुसार, कंपनीचे शेअर याच्या आयपीओ प्राइसपेक्षा 107.86% च्या प्रीमियमवर म्हणजे 145.5 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओची सद्यस्थिती
आयपीओच्या इतिहासातलं सर्वांत मोठं सबस्क्रिप्शन बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओला मिळालं आहे. एनएसईवरच्या माहितीनुसार, या आयपीओला 63.61 पट सबस्क्रिप्शन मिळालंय. कंपनीने 72,75,75,756 शेअर्स विक्रीसाठी काढले होते; पण आतापर्यंत 45,80,94,11,808 शेअर्ससाठी बोली लावण्यात आली आहे.
कॅटेगरीनुसार पाहायचं झाल्यास, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (NII) त्यांच्या ठराविक कोट्यापेक्षा 41.51 पट जास्त सबस्क्राइब केलंय. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (QIB) त्यांच्या कोट्याच्या 209.36 पट सबस्क्राइब केलंय. किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यापेक्षा 7.04 पट सबस्क्रिप्शन मिळालं.
