5 वर्षांनंतर अंशतः पैसे काढण्याचा ऑप्शन
पीपीएफ अकाउंटधारकांना अकाउंट उघडल्यापासून 5 वर्षांनी शिल्लक रकमेचा काही भाग काढण्याची परवानगी आहे. चौथ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी पैसे काढण्यापूर्वी तुम्ही 50% पर्यंत रक्कम काढू शकता. पीपीएफ अकाउंट मुदतपूर्तीपूर्वी अकाली बंद करण्याची परवानगी केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्येच दिली जाते. जसे की वैद्यकीय आणीबाणी, उच्च शिक्षणासाठी पैशाची गरज किंवा एनआरआय होणे. तसंच, मुदतपूर्व बंद केल्याबद्दल दंड म्हणून, मिळालेल्या व्याजाच्या 1% रक्कम वजा केली जाते.
advertisement
FD करावी की स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक, दोन्हीपैकी काय फायदेशीर?
5 वर्षापूर्वी पीपीएफ अकाउंट बंद करण्याची परवानगी नाही
अकाउंट उघडण्याच्या तारखेपासून किमान 5 वर्षे आधी पीपीएफ अकाउंट बंद करता येत नाही. खातेधारकाने अकाउंट बंद करण्यापूर्वी फॉर्म 5 आणि सहाय्यक कागदपत्रे पीपीएफ अकाउंट असलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावीत. प्री-क्लोजर दरम्यान, खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम काढावी लागते.
SBI की Post Office, FD वर सर्वाधिक व्याज कोण देतंय? लगेच करा चेक
मुदतपूर्तीपूर्वी पीपीएफ अकाउंट कसे बंद करावे
- सर्वप्रथम तुमचे पीपीएफ अकाउंट असलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा.
- फॉर्म 5 भरा, जो PPF अकाउंट बंद करण्याचा फॉर्म आहे.
- वैद्यकीय आणीबाणीसाठी, वैद्यकीय अहवाल आणि रुग्णालयाची बिले द्या.
- पडताळणीनंतर, बँक/पोस्ट ऑफिस तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल.
- यानंतर, शिल्लक रक्कम तुमच्या लिंक्ड सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल.
तुमचे PPF खाते अकाली बंद होण्याचे कारण सांगणारी आवश्यक कागदपत्रे सादर करा.
उच्च शिक्षणासाठी, प्रवेश पत्र आणि शुल्क पावत्या सादर करा.
निवास स्थिती बदलल्यास (एनआरआय), व्हिसा आणि पासपोर्ट सारखे पुरावे द्या.
जर माहिती बरोबर असल्याचे आढळले तर तुमचे पीपीएफ अकाउंट बंद केले जाईल.
बँक/पोस्ट ऑफिसनुसार, ही प्रक्रिया करण्यासाठी 7-10 दिवस लागतील.