सर्व बिले वेळेवर भरा
तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पेमेंटमध्ये कधीही विलंब करू नका. क्रेडिट कार्ड बिल असो, कर्जाचा EMI असो किंवा इतर कोणताही पेमेंट असो, देय तारखेपूर्वी पैसे देणे नेहमीच चांगले. विलंब किंवा डिफॉल्ट तुमच्या स्कोअरला हानी पोहोचवू शकतात.
क्रेडिट कार्ड घेणं ठरु शकतं फायदेशीर
advertisement
तुम्ही आतापर्यंत कोणतंही क्रेडिट कार्ड घेतलेलं नाही, तर तुमचं क्रेडिट स्कोअरही तयार होत नाही. हे सुरुवातीला योग्य वाटत असलं तरीही लोनची गरज पडल्यावर अडचण येऊ शकते. क्रेड कार्ड घेतल्याने तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होते. ज्यामुळे भविष्यात कमी व्याजदरावर लोन मिळण्यातही मदत मिळते. पहिल्यांदा कार्ड घेणाऱ्यांसाठी सिक्योर्ड क्रेडिट कार्ड चांगला पर्याय आहे.
LIC पॉलिसी मध्येच बंद करता येते का? किती होते नुकसान, एकदा पाहाच
क्रेडिट युटिलायझेशन 30% पेक्षा कमी ठेवा
चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी, तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापरणे महत्त्वाचे आहे. तुमची लिमिट ₹1 लाख असेल, तर तुमचा खर्च ₹30,000 च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो.
क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठी अर्ज करा
तुम्ही वेळेवर पेमेंट करत असाल आणि क्रेडिट वापर कमी असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेकडून क्रेडिट लिमिट वाढवण्याची विनंती करू शकता. वाढलेली लिमिट एक जबाबदार ग्राहक म्हणून तुमची जबाबदारी दर्शवते. तसंच, लिमिट वाढल्यानंतरही, जास्त खर्च टाळणे महत्वाचे आहे.
सिक्योर्ड किंवा कॅश-बेस्ड क्रेडिट कार्ड निवडा
कॅश-बेस्ड क्रेडिट कार्ड हा तुमचा CIBIL स्कोअर लवकर सुधारण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. तुम्हाला बँकेत एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल, जी तुमची क्रेडिट लिमिट बनते. हे बँकेसाठी सुरक्षित आहे आणि नवीन यूझर सहजपणे क्रेडिट कार्ड मिळवू शकतात, तसेच त्यांचा स्कोअर लवकर सुधारू शकतात.
मुलांच्या नावावर PPF मध्ये गुंतवणूक करताय? टाळा या 3 चुका, अन्यथा होईल नुकसान
एकाचवेळी अनेक लोन किंवा कार्ड घेणे टाळा
एकाचवेळी अनेक लोन किंवा क्रेडिट कार्ड असणे तुमची पैसे भरण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करते. यामुळे बँक तुम्हाला जास्त जोखिम असणारे ग्राहक मानू शकतात. यामुळे मर्यादित क्रेडिट कार्ड घ्या आणि वेगवेगळ्या लोन घेण्यामध्ये अंतर ठेवा.
तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे नियमितपणे निरीक्षण करा
भारतात चार मान्यताप्राप्त क्रेडिट ब्युरो आहेत: CIBIL, Equifax, Experian आणि Highmark. त्यांच्या रिपोर्टमधील कोणत्याही चुका किंवा चुकीच्या नोंदी तुमच्या स्कोअरवर थेट परिणाम करतात. तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासल्याने तुम्हाला अशा चुका वेळेवर दुरुस्त करण्यास आणि 30 दिवसांच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होऊ शकते.
