मग नेमकं करायचं काय?
आज आम्ही तुम्हाला एक अशी सीक्रेट गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही फॉलो करुन पैसे सुरक्षित ठेवू शकता. इतकंच नाही तर यामुळे तुमचं नुकसानही होणार नाही. तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमध्ये एकाच प्रकारची गुंतवणूक करू नका. यामध्ये थोडे पैसे बँकेत, थोडे शेअर मार्केट, थोडे बँक खात्यावर, थोडे सोन्या-चांदीमध्ये असे वेगेवगळे पर्याय वापरू शकतात. यामुळे अडीअडचणीच्या काळात तुम्हाला गरजेनुसार एक पर्याय वापरून पैसे काढताही येतील आणि सगळे पैसे एकदम बुडण्याची भीतीही उरणार नाही.
advertisement
बँक खात्यावर कशी करायची गुंतवणूक?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फक्त सहकारी बँकांवर अवलंबून राहू नका. सहकारी बँकांमध्ये जरी व्याजदर चांगलं मिळालं तर त्या बंद होण्याचा किंवा बुडण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारी आणि नॅशनल अशा दोन्ही बँकांमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर फायदा होईल. शिवाय बँकेच्या नियमानुसार बँक दिवाळखोरीत निघाली, बँक बंद पडली किंवा बुडाली तर ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच रक्कम मिळते. त्यावरील रक्कम ग्राहकांना मिळत नाही.
सोन्या-चांदीत गुंतवणूक
सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक स्त्रीधन म्हणून जरी चांगली असली तरीसुद्धा दागिन्यांमधून रिटर्न्स कमी मिळतात. त्याऐवजी तुम्ही ऑनलाईन गोल्ड कॉईन, ऑफलाईन गोल्ड कॉइन घेऊन तुम्ही पैसे गुंतवू शकता.
शेअर मार्केटमध्ये गुंतवूण
शेअर मार्केट-म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक धोक्याची आहे असं जरी असलं तरी 3-5 वर्षात मार्केट रिस्कनुसार रिटर्न्सही मिळतात. मार्केटचा मूड चांगला असेल तर रिटर्न्स दुप्पट मिळतात. त्यामुळे तुम्ही तिथेही थोडे पैसे गुंतवले तर कमी कालावधीत जास्त फायदा मिळू शकतो. मात्र अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे. अन्यथा पैशांचं नुकसान होईल.
बॉन्ड
काही ठराविक रक्कम ही तुम्ही बोन्ड खरेदी करून साठवू शकतात. सरकारी कंपन्या, बँकांचे बॉन्ड घेऊन त्यावर तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता. ती एक चांगली गुंतवणूक आहे. त्यावर सरकारकडून चांगले रिटर्न्स देखील मिळतात.
रियल इस्टेट
रियल इस्टेटमध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. ही रक्कम मोठी असते. मात्र त्यातून दीर्घकाळानंतर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. जमीन, जागा, गाळा, घर अशा गोष्टींमधून गुंतवणूक करू शकता.
पॉलिसी
LIC, NPS सारख्या योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. शिवाय, PPF, सुकन्या समृद्धी सारख्या योजना या सरकारी योजना आहेत. ज्यात आयकरातून सूट मिळतेच शिवाय तुमच्या मुलांचं भविष्यही सुरक्षित होण्यासाठी मदत होते.
कधीही एक किंवा दोन ठिकाणी गुंतवणूक करू नये. तुमचा पोर्टफोलियोमध्ये नेहमी वेगवेगळी गुंतवणूक असावी. त्यामुळे नुकसान कमी होतं आणि त्याचा फायदाही जास्त मिळतो. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने तुम्हाला सोयीनुसार आणि गरजेनुसार पैसे काढता येतात.