कर्जदाराचा मृत्यू झाल्यास वसुली कशी होते?
जर एखाद्या कर्जदाराचा मृत्यू झाला. तर बँक प्रथम को-अप्लिकंट (सह-आवेदक) कडे वळते. हे सहसा गृहकर्ज, एज्युकेशन लोन किंवा जॉइंट लोनमध्ये असते. जर को-अप्लिकंट कर्ज फेडू शकत नसेल, तर बँक गारंटर (हमीदार) कडे वळते. गारंटरही असमर्थ असेल किंवा नकार दिल्यास, बँक कायदेशीर उत्तराधिकारी (legal heirs) कडे वळते. जसे की पत्नी, मुलं, आई-वडील आदी. बँक त्यांच्याकडे कर्ज फेडण्याची मागणी करू शकते.
advertisement
बँक मालमत्ता जप्त कधी करू शकते?
जर को-अप्लिकंट, गारंटर आणि कायदेशीर वारसदारांनी कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवली. तर बँकेला खालीलप्रमाणे जप्तीचा अधिकार असतो:
होम लोन: घर जप्त करून लिलावाद्वारे विक्री
ऑटो लोन: वाहन जप्त करून विक्री
पर्सनल लोन: इतर मालमत्तेवर जप्ती आणि विक्री
लोन प्रोटेक्शन इंश्युरन्स असल्यास काय?
जर कर्जदाराने लोन प्रोटेक्शन इंश्युरन्स घेतले असेल. तर त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्ज विमा कंपनी भरते. त्यामुळे कुटुंबीयांवर कोणतेही आर्थिक ओझे येत नाही.
कायदेशीर वारसदार जबाबदार आहेत का?
जर कायदेशीर वारसदाराने मृत व्यक्तीची मालमत्ता उत्तराधिकारात स्वीकारलेली असेल, तर त्याच्यावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते. मात्र जर मालमत्ता स्वीकारलेली नसेल तर बँक त्याच्यावर कर्ज फेडण्याचा प्रेशर टाकू शकत नाही.
