TRENDING:

Share Market हलवणारे 4 डायनामाइट शेअर्स,10 हजाराचे झाले 5 लाख; गुंतवणुकदारांमध्ये खळबळ

Last Updated:

Multibagger Stock : 2025 मध्ये शेअर बाजारात अनेक चढ-उतार झाले, पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना अक्षरशः श्रीमंत बनवलं. RRP Semiconductors, Midwest Gold, Elitcon International आणि GHV Infra Projects यांनी दिलेले हजारो टक्के परतावे पाहून बाजारच थक्क झाला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: वर्ष 2025 मध्ये जरी शेअर बाजारात चढ-उतार सुरू असले, तरी काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड नफा दिला आहे. या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांतच या शेअर्सनी अनेक पटीने वाढ केली असून, हे गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः जॅकपॉट ठरले आहेत. मल्टिबॅगर चार शेअर्सविषयी जाणून घ्या...

advertisement

वर्ष 2025 मध्ये RRP Semiconductors, Midwest Gold Limited, Elitcon International Limited आणि GHV Infra Projects Limited या चार शेअर्सनी अप्रतिम परतावा दिला आहे. या शेअर्सचा रिटर्न 1600% ते 5100% दरम्यान राहिला आहे.

advertisement

सेमिकंडक्टर क्षेत्रातील RRP Semiconductors या कंपनीच्या शेअरने 2025 मध्ये सर्वात मोठी झेप घेतली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी या मल्टिबॅगर शेअरची किंमत 185.50 होती, जी आता वाढून 10,464 पर्यंत पोहोचली आहे. एकूणच या शेअरने या वर्षात जवळपास 5541% परतावा दिला आहे.

advertisement

आज म्हणजे बुधवार 29 ऑक्टोबर रोजी RRP Semiconductors चा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह 10,464 वर व्यवहार करत आहे. मंगळवार 28 ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर अपर सर्किटसह 10,259.25 वर बंद झाला होता. मागील सहा महिन्यांत या शेअरचा भाव 1100% ने वाढला आहे, तर गेल्या महिन्यातच तो 48% ने वाढला आहे.

advertisement

गोल्ड आणि नॅचरल स्टोन व्यवसाय करणाऱ्या Midwest Gold Limited या कंपनीचा शेअर देखील या वर्षी मल्टिबॅगर यादीत सामील झाला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1739% चा परतावा दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला याची किंमत 117.10 होती, जी वाढून 2,153.75 पर्यंत गेली आहे.

Elitcon International च्या शेअरमध्येही या वर्षी जोरदार तेजी दिसली आहे. जानेवारी 2025 मध्ये या शेअरची किंमत 10.37 होती. जी आता 156 झाली आहे. म्हणजेच या वर्षी जवळपास 1400% इतका परतावा मिळाला आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या FMCG व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. कंपनीने Landsmill Agro Private Limited मध्ये 55% आणि Sunbridge Agro Private Limited मध्ये 51.65% हिस्सेदारी घेतली आहे.

Elitcon International ने केलेली ही गुंतवणूक FMCG क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. हा मल्टिबॅगर शेअर गेल्या सहा महिन्यांत 347% परतावा देत आहे. मात्र, गेल्या महिन्यात त्याच्या किंमतीत 26% घट झाली आहे.

GHV Infra Projects Limited चा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी सोन्याची खाण ठरला आहे. 2025 मध्ये या शेअरची किंमत 18.19 वरून वाढून 320 झाली आहे. म्हणजेच 1,650% परतावा. गेल्या पाच वर्षांत हा शेअर तब्बल 10,000% ने वाढला आहे. फक्त सहा महिन्यांतच या शेअरने 275% चा परतावा दिला आहे.

मराठी बातम्या/मनी/
Share Market हलवणारे 4 डायनामाइट शेअर्स,10 हजाराचे झाले 5 लाख; गुंतवणुकदारांमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल