१. टॅक्समध्ये फॉर्म १६ ची सुट्टी!
आतापर्यंत नोकरदारांसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला 'फॉर्म १६' इतिहास जमा झाला असून, त्याजागी आता '१३० नंबरचा फॉर्म' आला आहे. विशेष म्हणजे, आता 'फायनान्शिअल इयर' आणि 'असेसमेंट इयर' ही संकल्पना संपून फक्त 'टॅक्स इयर' असेल. म्हणजेच ज्या वर्षी कमवाल, त्याच वर्षी टॅक्स भरावा लागेल. तसेच, आयटीआर भरण्याची मुदत ३१ जुलैऐवजी आता ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.
advertisement
२. पॅन कार्डबाबत आता नो कॉम्प्रोमाईज
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता फक्त आधार कार्ड देऊन चालणार नाही, तर नवीन फॉर्म (९३-९६) भरावा लागेल. जर तुमच्या आधार आणि पॅनवरील नावात छोटीशी जरी चूक असेल, तर तुमचं पॅन कार्ड तातडीने निष्क्रिय होऊ शकतं. गाड्यांची खरेदी, ५ लाखांवरील व्यवहार किंवा कोणत्याही प्रॉपर्टीसाठी आता पॅन कार्ड अनिवार्य असेल.
३. हातात येणारा पगार घटणार
नोकरदारांसाठी हा मोठा बदल आहे. नव्या नियमांनुसार, तुमचा मूळ पगार (Basic Pay) आणि महागाई भत्ता तुमच्या एकूण पगाराच्या ५० टक्के असणं अनिवार्य आहे. यामुळे तुमचा पीएफ (PF) वाढेल, जो भविष्यासाठी चांगला असला तरी, दरमहा हातात येणारा पगार मात्र थोडा कमी होईल.
४. रेल्वे तिकीट रद्द करणं आता विसरा!
प्रवाशांसाठी रेल्वेने नियम अत्यंत कडक केले आहेत. आता ट्रेन सुटण्यापूर्वी किमान ८ तास आधी तिकीट रद्द केलं, तरच रिफंड मिळेल. पूर्वी ही मुदत ४ तासांची होती. ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास तुम्हाला एक रुपयाही परत मिळणार नाही.
५. बँकिंग आणि UPI वर चार्जेसचा बोजा
जर तुम्ही क्रेडिट कार्डने बिल भरलं, तर त्यावर १ टक्का जास्तीचे शुल्क लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, UPI ने व्यवहार करणाऱ्यांसाठी महिन्याची 'फ्री लिमिट' संपली की प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २३ रुपये मोजावे लागतील. तसेच १० लाखांहून अधिकच्या व्यवहारांची माहिती बँका थेट आयकर विभागाला देणार आहेत.
६. डिजिटल पेमेंटसाठी डबल लेअर सुरक्षा
ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' (2FA) सक्तीचं केलं आहे. आता फक्त ओटीपी टाकून पेमेंट होणार नाही. त्यासोबत तुमचा फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा डिव्हाइस बाइंडिंग यापैकी एक गोष्ट अनिवार्य असेल.
७. शेअर बाजार आणि सोन्याची गुंतवणूक महागली
शेअर बाजारात 'एफ अँड ओ' (F&O) ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी टॅक्स वाढवण्यात आला आहे. तो आता ०.१ टक्क्यावरून ०.१५ टक्के झाला आहे. तसेच, जर तुम्ही सोन्याचे बॉण्ड्स (SGB) सेकंडरी मार्केटमधून घेतले असतील, तर आता त्यावर टॅक्स भरावा लागेल.
